गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By

बिटाचा रस वाढवितो हृदयरुग्णांची व्यायाम क्षमता

बिटच्या लाल रंगामुळे शरीरातील रक्तातील वाढ होते हे सगळ्यांनाच माहीत आहे. मात्र त्याचे आणखीही लाभ आहेत. बिटाचा रस हृदयाची समस्या असलेल्या रुग्णांमध्ये व्यायामाची क्षमता वाढविण्यासही मदत करू शकतो, असे एका अध्ययनात आढळून आले आहे. व्यायामाची क्षमता हृदयरुग्णाच्या जीवनाची गुणवत्ता व एवढेच नाही तर त्यांच्या जिवंत राहण्याशी निगडित महत्त्वाचा घटक आहे, असे अमेरिकेतील इंडियाना विापीठातील शास्त्रज्ञांनी सांगितले. या अध्ययनात आठ हृदयरुग्णांच्या व्यायाम क्षमतेवर बिटाचा रस पूरक आहाराच्या रुपात डायटरी नायट्रेटच्या प्रभावाची पडताळणी करण्यात आली. अशा अवस्थेत हृदयाचे स्नायू प्रभावीपणे काम करत नाहीत. त्यामुळे शरीराला पुरेसा ऑक्सिजन असलेले रक्त मिळू शकत नाही. हृदयविकाराने जगभरात लाखो लोक ग्रस्त आहेत. त्यांच्यातील निम्म्या लोकांमध्ये हृदयाचे इंजेक्शन फ्रॅक्शन कमी असते. यामागचे कारण या लोकांना श्र्वास घेताना त्रास होतो, पुरेसा ऑक्सिजन घेणे कमी होते व व्यायाम करताना जास्त ऊर्जा लागते, असे शास्त्रज्ञांनी सांगितले. मात्र बिटाच्या रसाचा खुराक घेतल्यास त्यांच्या व्यायामाच्या कालावधी, ऊर्जा व ऑक्सिजन वेगाने घेण्यात लक्षणीय वाढ झाल्याचे शास्त्रज्ञांना दिसून आले. या सुधारणेमध्ये रुग्णाच्या श्र्वास घेण्याच्या प्रतिक्रियेत कोणताच बदल करण्यात आला नव्हता.