गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By

जगातील 30 कोटी लोक नैराश्‍यग्रस्त - डब्लूएचओ

जीवनात माणासाला यशासह अपयशही पाहावे लागते. मात्र जीवनातील अपयशांचे ओझे माणसाने पेलावयास शिकायलाच हवे, नाहीतर त्यातून नैराश्‍य येते असे एका संशोधनातून पुढे आले आहे.
 
वर्ल्ड हेल्थ ऑगर्नायझेशनने याबाबत नुकताच एक अहवाल सादर केला. त्यानुसार जगातील तब्बल 30 कोटीहून अधिक व्यक्ती नैराश्‍याने ग्रस्त आहे. हा आकडा पाहिला असता जगभरातील सर्वच देशांसाठी ही धोक्‍याची घंटा की या देशांनी मानसिक आरोग्याबाबत पुन्हा एकदा विचार केला पाहिजे असेही या अहवालात म्हटले आहे. डब्लूएचओच्या मते, 2005 ते 2015 या कालावधीत नैराश्‍यग्रस्त लोकांच्या संख्येत तब्बल 18 टक्‍क्‍यांनी वाढ झाली असल्याचे सांगण्यात आले आहे.
 
नैराश्‍य आत्महत्या करण्यास कारणीभूत ठरणारे कारण आहे. देशात याच कारणामुळे मोठ्या प्रमाणात आत्महत्या होतात. त्यामुळे हा आकडा कमी कसा करता येईल याचा विचार जगभरातील देशांनी करायलाच हवा असेही या अहवालातून सांगण्यात आले आहे.