गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By

तुमचे देखील बाळ अंगठा चोखते का ? होऊ शकतात या समस्या

Baby Sucking Thumb
लहान मुलांनी अंगठा चोखणे सामान्य गोष्ट आहे. हा एक सामान्य आणि स्वाभाविक व्यवहार आहे. जो त्यांना शांत आणि सुरक्षित असल्याची जाणीव करून देतो. पण जसे मुलं मोठे होतात तशी ही सवय चिंतेचा विषय बनू शकते. या लेख मध्ये आपण या सवयींबद्दल जाणून घेणार आहोत. 
 
*अंगठा चोखणे ही क्रिया केव्हा सुरु होते
अनेक लहान बाळ गर्भावस्था दरम्यानच अंगठा चोखायला सुरुवात करतात. ही एक स्वाभाविक प्रक्रिया आहे जी शांत आणि सुरक्षित असल्याची जाणीव करून देते. कमीतकमी 2 किंवा 4 वर्षानंतर ही सवय सुटून जाते. 
 
*अंगठा चोखण्याचे कारण 
1. सुरक्षा आणि आराम- अंगठा चोखल्याने बाळाला आरामदायी वाटते. 
 
2. स्वतःला शांत करणे- अंगठा चोखल्याने बाळाला स्वतःला शांत करण्यास मदत मिळते. ही प्रक्रिया त्यांना रडणे किंवा राग येणे यापासून दूर राहण्यासाठी मदत करते. 
 
3. स्वतःला झोपवणे- अंगठा चोखतांना मुलांना स्वतःला झोपवण्यासाठी मदत मिळते. 
 
4. दात निघणे- जेव्हा मुलांचे दात निघतात. तेव्हा ते अंगठा चोखायला लागतात. त्यांच्या हिरड्यांमध्ये खाज येते किंवा दुखते. अंगठा चोखल्यास त्यांना अराम मिळतो. 
 
5. काही नवीन शिकणे- जेव्हा मुले काही नवीन शिकतात. तेव्हा ते अंगठा चोखायला लागतात. ही प्रक्रिया त्यांना शांत आणि ध्यान केंद्रित करण्यासाठी मदत करते. 
 
*अंगठा चोखण्याची सवय कधी समस्या बनते? 
जेव्हा तुमचा मुलगा चार वर्षाचा होतो तेव्हा हें सवय समस्या बनू शकते. 
 
वारंवार अंगठा चोखणाऱ्या मुलांच्या दातांची संरचना प्रभावित होऊ शकते. ज्यामुळे दातांची ठेवण चुकीच्या पद्धतीने होउ शकते. ज्यामुळे दात वाकडे येणे किंवा दातांमध्ये गॅप निर्मण होणे यांसारख्या समस्या येऊ शकतात. वारंवार अंगठा चोखल्याने मुलांचे बोलणे विकसित होत नाही. त्यांचे शब्द स्पष्ट निघत नाही. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Edited By- Dhanashri Naik