शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: शनिवार, 10 जून 2023 (08:21 IST)

World Eye Donation Day : मृत्यूनंतर देखील आपण हे सुंदर जग बघू शकता

World Eye Donation Day
जागतिक आरोग्य संघटनेनुसार कार्निया संबंधित आजार, मोतीबिंदू आणि काचबिंदू नंतर होणाऱ्या दृष्टी हानी अंधत्व होण्याच्या मुख्य कारणांपैकी प्रमुख कारण आहे. 
 
दर वर्षी विविध देशांमध्ये नेत्रदानाचे महत्व समजून 10 जून रोजी आंतरराष्ट्रीय दृष्टीदान दिन म्हणून साजरा केला जातो. या माध्यमातून लोकांमध्ये नेत्रदानाची जनजागृती केली जाते. जागतिक दृष्टी दिनाचे उध्दिष्टये नेत्रदानाचे महत्व या बद्दलची जनजागृती करून लोकांना मृत्यूनंतर डोळे दान करण्याची प्रतिज्ञा घेण्यास प्रवृत्त करणे आहे. 
 
विकासशील देशामध्ये सार्वजनिक आरोग्याच्या समस्यांपैकी अंधत्व ही मुख्य समस्या आहे. आपल्या आयुष्यात डोळ्यांचे फार महत्व आहे. हे तर आपण सर्वानाच ठाऊक आहेत. जगातील सर्व सुंदर वस्तू आणि सुंदर जगाचा आनंद आपल्या डोळ्यांमुळेच घेउ शकतो. डोळ्यांशिवाय राहण्याची कल्पना करणे अशक्यच आहे. डोळ्यांशिवाय सुंदर रंगांची कल्पना करणे देखील अशक्य आहेत. सध्याचा काळात बदलणारी जीवनशैली, अनियमित दिनचर्या, प्रदूषण आणि मानसिक ताण जास्त प्रमाणात वाढल्याने बहुतेक लोकांना डोळ्यांच्या त्रासाला सामोरा जावं लागतं. काही जणांना हा त्रास लहानग्या वाया पासूनच असतो तर काहींना वयाच्या मध्यकाळात होतो.
 
हे जग फार सुंदर आहे. आपल्या जवळपासच्या सर्व वस्तूंमध्ये सुंदरता दडलेली असते. ज्याला बघण्यासाठी एका वेगळ्या दृष्टीकोणाची गरज असते. जगामध्ये प्रत्येक वस्तूला बघण्यासाठी आपण डोळ्यांचाच आधार घेतो. पण आपण ह्याचा कधी विचार केला आहे का की डोळ्यांशिवाय हे जग कशे असेल? सर्वत्र अंधारच पसरणार. जगाचे सौंदर्य डोळ्यांशिवाय काहीच नाही. डोळे नसल्याचे दुःख त्यालाच ठाऊक ज्याकडे दृष्टी नाही.
 
थोड्या वेळ आपल्या डोळ्यांवर कापड बांधून ठेवा, बघा हे जग कसे वाटते ते? असे केल्यास आपल्याला अंधाराची भीती वाटते. डोळ्यांशिवाय चालणे देखील अशक्य आहे. म्हणूनच माणूस आपल्या डोळ्यांची खूप काळजी घेतो. पण काही असे दुर्देवी असतात ज्यांचा आयुष्यात कायमचा अंधारच असतो. त्यांना दृष्टीच नसते. काही तर मुलं दृष्टीहीनच या जगात येतात. तर काही जण कुठल्या तरी अपघातामुळे आपले डोळे गमावतात. 
 
जगभरात दृष्टीहीन लोकांची संख्या जास्त आहे या मधील तर काही जण जन्मांध असतात. तर काही दुर्देवी जण रक्ताच्या कर्करोगामुळे आपल्या डोळ्यांच्या दृष्टी बरोबरच आपले प्राण देखील गमावतात. 
 
डोळ्यांचे महत्व आपण सर्वाना माहित आहे म्हणूनच आपण याचे संरक्षण मोठ्या प्रमाणात करत असतो. पण आपल्यापैकी बरेच जण असतात जे आपल्या बरोबर दुसऱ्यांचा देखील विचार करतात. डोळे जे निव्वळ आपल्यालाच प्रकाश न देता दुसऱ्याच्या आयुष्यात देखील आपल्या मृत्यू पश्चात अंधार काढून टाकतात. 
 
पण जेव्हा नेत्रादानाबद्दल बोलले जाते तर बरेच जण या अंधश्रद्धे पोटी माघारी घेतात की पुढच्या जन्मी देखील जन्म आंधळं तर होणार नाही न. त्यांचा या अंधश्रद्धेमुळे जगातील बऱ्याचश्या अंध व्यक्तींना आयुष्यात अंधारातच राहावे लागतात. 
 
आपण उचललेले एखादे चांगले पाऊलामुळे एका दृष्टीहीनाचं आयुष्य बहरू शकतं. बाहेरील जगाशी संपर्क आपण आपल्या नेत्रांच्या मदतीने करत असतो. म्हणून या डोळ्यांची उपयुक्तता आपल्या दैनंदिन जीवनासाठी सर्वात जास्त आहे. डोळ्यांचे महत्व आपल्याला तेव्हा जाणवतात ज्यावेळी आपण एखाद्या दृष्टीहीन व्यक्तीच्या कृतींना बघत असतो. वाटेवरून चालणे तर लांब, घरात देखील ते मोकळ्यापणी चालू फिरू शकत नाही. त्यांना नेहमीच कोणाच्या आधाराची गरज असते. त्यांचा दैनंदिन जीवनात फार अडचणी येतात.
 
डोळ्यांची काळजी कशी घेउ शकतो ?
* योग्य आणि पोषक आहाराचे सेवन
* धूम्रपान सोडणे 
* सूर्याच्या थेट प्रकाशापासून वाचणे 
* सेफ्टी ग्लासेस वापरणे
* कॉम्प्युटरवर काम करताना डोळ्यांचा कोरडेपणा कमी करण्यासाठी डोळ्यांची उघडझाप करा.
* टीव्ही बघताना किंवा संगणकावर काम करतांना अँटी ग्लेयर चष्मा वापरणे 
* कमी प्रकाशात वाचन न करणे 
* नियमाने डोळ्यांची तपासणी करवणे
* डोळ्यांवर चकाकी पासून वाचण्याचा प्रयत्न
* कॉन्टॅक्ट लॅन्सचा वापर जास्त काळ करणे टाळावे
 
असे बरेच कारणे आहेत ज्यामुळे लोकं नेत्रदान करत नाही. भारतामधील नेत्रदान करणाऱ्यांची संख्या खालील कारणांमुळे अत्यंत कमी आहे-
1 सामान्य लोकांमध्ये जागरूकतेचा अभाव 
2 संस्था आणि रुग्णालयात अपूर्ण सुविधा
3 प्रशिक्षित असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये इतरांना प्रेरित करण्याची क्षमता नसणे
4 सामाजिक आणि धार्मिक मान्यता
 
नेत्रदान कसं करावं
नेत्रदानाची प्रक्रिया मृत्यूच्या काही तासातच केली जाते आणि यापासून कोणत्याही प्रकाराचा त्रास होत नाही. एका मरण पावलेल्या व्यक्तीचे डोळे एका आंधळ्या व्यक्तीला दिले जाते. जेणे करून त्या अंध व्यक्तीच्या आयुष्यात उजेड होऊ शकतो. जर का आपण देखील एखाद्या आंधळ्याचा आयुष्यात उजेड पाडू इच्छित असल्यास आपल्या जवळच्या रुग्णालयात संपर्क साधून नेत्रदानासाठी नोंदणी करू शकता. एखाद्या आंधळ्याच्या आयुष्यात प्रकाश व्हावा यासाठी आपण देखील एक पाउल पुढे टाका. 
 
एका आकडेवारीनुसार भारतात तब्बल सव्वा कोटी लोक आंधळे आहेत, त्यापैकी किमान 30 लक्ष लोकांना नेत्र प्रत्यारोपणाच्या माध्यमातून दृष्टी मिळू शकते. जितके लोकं आपल्या देशात मरण पावतात त्यांनी आपल्या मृत्यूनंतर आपले डोळे दान केल्यास देशाच्या सर्व आंधळ्या लोकांना दृष्टी मिळेल. 
 
मृत्यूनंतर जास्तीत जास्त सहा तासांच्या आत नेत्रदान करता येते.
कुठलाही माणुस नेत्रदान करु शकतो. 
दात्याला वयाचं बंधन नाही, कुठल्याही वयाचा माणुस नेत्रदान करु शकतो. 
अशा दात्याची नोंदणी असणे आवश्यक असते. 
परंतु ज्या व्यक्तिंना एड्स, सिफलिस किंवा रक्ताचे इन्फेक्शन असेल किंवा मृत्यु रेबीजमुळे झाल्यास नेत्रदान करता येत नाही.
नेत्रदान करण्यासाठी जवळच्या आय बॅंक मध्ये जाउन नोंदणी करणे आवश्यक असते.
मृत्यूनंतर नेत्रपेढीस ताबडतोब कळवावे.
मृत व्यक्तीच्या डोळ्यांवर ओला कापूस ठेवावा.
अँटिबायोटिक ड्रॉप डोळ्यांत टाकावेत.