शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 जानेवारी 2021 (10:13 IST)

संधिवाताची लक्षणे अशा प्रकारे ओळखा

संधिवात ज्याला आर्थराइटिस असे ही म्हणतात, हे सांध्याची एक प्रकारची सूज आहे. हे एक सांध्याला किंवा अनेक सांध्यांवर देखील परिणाम करू शकतात. ह्याचे लक्षण सहसा कालांतराने विकसित होतात, किंवा ते एकाएकी देखील दिसून येतात. संधिवात सामान्यतः 65 वर्षापेक्षा अधिक वयाच्या प्रौढांमध्ये आढळते, परंतु हे लहान मुले, तरुणांमध्ये आणि किशोरांमध्ये देखील विकसित होऊ शकतं. बऱ्याच वेळा लोक ह्याच्या लक्षणाने ह्याची ओळख करू शकतं नाही. चला तर मग आज आम्ही संधिवाताचे असे काही लक्षणे सांगत आहोत, ज्याच्या साहाय्याने माहित होऊ शकतो की संधिवात आहे किंवा नाही.
 
1 थकवा -
आरोग्य तज्ज्ञ म्हणतात की संधिवात झाल्यावर एखाद्या माणसाला असामान्य थकवा जाणवतो. आठवड्याने किंवा महिन्याने इतर लक्षणांची सुरुवात होऊ शकते. कधी-कधी एखाद्या माणसाला थकव्यासह उदास देखील वाटू शकते.
 
2 मॉर्निंग स्टिफनेस -
आरोग्य तज्ज्ञांच्या मते,मॉर्निंग स्टिफनेस बहुतेक वेळा संधिवाताचे एक प्रारंभिक लक्षण म्हणून दिसून येतात.हे मॉर्निंग स्टिफनेस काही मिनिटां पुरतीच असतो, सहसा हे संधिवाताचे एक प्रकारचे लक्षण आहे. ह्याचे योग्य उपचार केले नाही तर परिस्थिती अधिकच बिघडू शकते.
 
3 सांधे आखडणे -
एक किंवा अधिक सांध्यात कडकपणा जाणवणे हे देखील संधिवाताचे प्रारंभिक लक्षणे आहे. हे दिवसातून कोणत्याही वेळी होऊ शकतो.आपण सक्रिय असाल किंवा नसाल तरी ही. या मध्ये साधारणपणे हातांचे सांधे आखडतात. हे एक किंवा दोन दिवसात अनेक सांध्यांवर परिणाम करू शकतात.
 
4 सांधे दुखी -
संधिवात झाल्यावर सांधे आखडण्याच्या व्यतिरिक्त वेदना देखील जाणवते. हे शरीराच्या कोणत्याही संयुक्त भागात होऊ शकतो. या मुळे चालायला फिरायला किंवा काम करायला त्रास होऊ शकतो. वेदनेसाठी शरीरातील सर्वात सामान्य अवयव बोटे, मनगट आहे. या शिवाय, गुडघे, पाय, अँकल्स किंवा खांद्यात वेदना जाणवते.
 
5 ताप -
जेव्हा सांध्यातील वेदना आणि सूज सारख्या लक्षणांसह, कमी दर्जाचे ताप येणे हे चेतावणीचे लक्षण असू शकतात की आपल्याला संधिवाताचा त्रास आहे. तरी ही, 100 अंश किंवा त्यापेक्षा अधिक ताप कोणत्या आजारा कडे किंवा संसर्गाकडे सूचित करतो.