कांद्याच्या सालीचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या  
					
										
                                       
                  
				  				   
				   
                  				  आपण कांदा वापरण्यापूर्वी त्याचे साल काढून फेकून देतो, कांद्याच्या सालींमधे आरोग्याची गुपिते आहे.चला तर मग जाणून घेऊ या. 
				  													
						
																							
									  
	 
	1 बॅड कोलेस्ट्रॉल कमी होते -
	आपल्या शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यात मदत होते. या साठी कांद्याचे साल रात्रभर पाण्यात भिजत ठेवून ते पाणी सकाळी प्यायचे आहे,हे चवीला चांगले नसते, म्हणून आपण हे मध किंवा साखर मिसळून देखील पिऊ शकता .दररोज हे प्यायल्याने निश्चितच फरक जाणवेल.  
				  				  
	 
	2 त्वचेच्या ऍलर्जीला दूर करते -
	जर आपल्याला त्वचेच्या कोणत्याही गोष्टीची ऍलर्जी असेल तर वरील सांगितल्या प्रमाणे कांद्याच्या सालीचे पाणी बनवून ते पाणी दररोज त्वचेला लावून त्वचा स्वच्छ करावी.
				  											 
						
	 
							
							 
							
 
							
						
						 
																	
									  
	 
	3 केसांना सुंदर बनवते- केसांना सुंदर बनविण्यासाठी अनेक कंडिशनर वापरता,तर आपण केसांना सुंदर बनविण्यासाठी कांद्याच्या पाण्याचा वापर करू शकता. या मुळे आपले केस मऊ आणि चमकदार होतील. 
				  																								
											
									  
	 
	4 चेहऱ्यावरील डाग काढते- या साठी कांद्याचे रसाळ साल वापरा. कांद्याच्या सालींमध्ये हळद मिसळून डाग असलेल्या जागी लावा.लवकरच आपल्याला फरक जाणवेल. 
				  																	
									  
	 
	5 खराब घसा ठीक करतो- घसा खवखवत असेल तर कांद्याचे साल पाण्यात उकळवून घ्या आणि नंतर हे पाणी पिऊन घ्या. घशाशी संबंधित त्रासासाठी कांद्याचा चहा पिणं देखील फायदेशीर आहे.