बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शनिवार, 20 मार्च 2021 (19:08 IST)

मखाणे खाण्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घेऊ या

मखाणे हे हलके असतात. हे आहारात सुकेमेवे म्हणून समाविष्ट केले जाते. मखाणे नियमितपणे सेवन केल्याने अनेक फायदे मिळतात. याचे फायदे जाणून घेऊ या. 
 
सेवन केल्याचे फायदे -
 
1  मधुमेहासाठी फायदेशीर-आपल्याला मधुमेह असल्यास दररोज सकाळी अनोश्यापोटी चार मखाणे खावे.याचे नियमित सेवन केल्याने शरीरात इन्स्युलिन बनू लागतो आणि साखरेचे प्रमाण कमी होते. हळू‑हळू मधुमेहाचा आजार नाहीसा होतो.
 
2 हृदयासाठी फायदेशीर - मखाणे मधुमेहाच्या आजारासाठीच नव्हे तर हृदयविकाराच्या झटक्यासारख्या गंभीर आजारातही मखाणे फायदेशीर आहे. ह्याचे सेवन केल्याने हृदय निरोगी राहतो आणि पचनक्रिया देखील चांगली राहते. 
 
3 तणाव कमी होतो- मखाण्याचे सेवन केल्याने तणाव दूर होतो आणि निद्रानाश सारखा त्रास देखील दूर होतो. रात्री झोपण्यापूर्वी दुधासह मखाणे खावे. 
 
4 सांधेदुखीचा त्रास दूर होतो- मखाण्यात कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळते. दररोज याचे सेवन केल्याने सांधे दुखी,संधिवात सारखे आजार दूर होतात. 
 
5 पचन सुधारते- मखाण्यात अँटी ऑक्सीडेन्ट मुबलक प्रमाणात आढळतं. हे सर्व वयोगटाच्या लोकांसाठी फायदेशीर आहे. या शिवाय मखाण्यात एस्ट्रीजनगुणधर्म असतात या मुळे अतिसाराचा त्रास असल्यास आराम देतो आणि भूक सुधारण्यात मदत करतो. 
 
6 किडनी बळकट करतात- मखाणे हे स्प्लिन डिटॉक्सीफाय करतो. किडनीला बळकट करण्यासाठी आणि रक्त चांगले ठेवण्यासाठी  मखाणे नियमितपणे सेवन करावे.