मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 मार्च 2021 (17:32 IST)

विद्यार्थ्यांनी नियमितपणे हे योगासन करावे

वृक्षासन ज्याला ट्री पोज देखील म्हणतात कारण हे केल्याने माणूस वृक्षाप्रमाणे दिसतो. हे इतर आसनापेक्षा वेगळे आहे कारण बाकीच्या आसनामध्ये आसन करताना डोळे मिटून ठेवावे लागतात,परंतु या आसनामध्ये असे काहीच नसते. एकाग्रता वाढविण्यासाठी केले जाणारे हे आसन आपण संतुलन बनवून ठेवण्यासाठी डोळे उघडून देखील करू शकता. चला हे आसन करण्याची पद्धत आणि या पासून मिळणाऱ्या फायद्यां विषयी जाणून घेऊ या.  
 
वृक्षासन कसे करावे- 
सर्वप्रथम सरळ उभे राहावे.उजवा गुडघा वाकवून उजवा पंजा डाव्या  मांडीवर ठेवा. पायाचे तळ मांडीच्या वरील बाजूस लागलेले असावे.डावा पाय सरळ ठेवून संतुलन बनवा. संतुलन बनवून दीर्घ श्वास घेत हातांना डोक्याच्या वर नेऊन नमस्काराची मुद्रा बनवावी. सरळ बघावे आणि पाठीचा कणा ताठ असावा. आता डावा तळपाय उजव्या मांडीवर ठेवून ही प्रक्रिया पुन्हा करा. 
 
वृक्षासनाचे फायदे- 
* हे आसन संतुलन बनवून पाय आणि स्नायूंना बळकट करतो. 
* या आसनाचा नियमितपणे सराव केल्याने अभ्यासासाठी एकाग्रता वाढते. 
* नसांमध्ये वेदना होणाऱ्यांसाठी हे प्रभावी आहे. 
* हे आसन केल्याने शरीराला अधिक जास्तीची ऊर्जा मिळते. 
* हे आसन हातापायाच्या वेदनेला कमी करतो. 
 
** टीप - मायग्रेन, निद्रानाश, निम्न किंवा उच्च रक्तदाब असणाऱ्यांना लोकांनी हे आसन करू नये.