बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 22 मार्च 2021 (20:19 IST)

महाराष्ट्रात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लॉक डाऊनचे संकेत दिले

सध्या कोरोनाच्या रुग्णात विक्रमी वाढ होत असून सर्वत्र चिंताजनक स्थिती बनली आहे. नागरिक कोरोनाच्या नियमाचे पालन करताना  दिसत नाही. त्यामुळे रुग्णाच्या संख्येत होणाऱ्या वाढी मुळे लॉक डाऊन लावण्याचे संकेत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.
सध्या महाराष्ट्रात कोरोनाची ही दुसरी लाट असल्याचे सांगितले जात आहे. कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत होणाऱ्या वाढीमुळे रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ होत आहे. ही एक चिंतेची बाब आहे. ते म्हणाले की मुंबई,पुणे,नागपूर,या तीन शहरात सातत्याने आणि झपाट्याने कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि कोरोनाची शृंखला थांबविण्यासाठी पुन्हा एकदा लॉक डाऊन लाववण्याचे संकेत त्यांनी दिले. या बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल असे ही आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले. 
 
सध्या पुण्यात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे रुग्णालयात जागा नसल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच रुग्णालयात 80 :20 लागू करून खाटांची संख्या वाढविण्यात येईल असे ही ते म्हणाले.