1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 20 मार्च 2021 (22:24 IST)

.'महाराष्ट्र' देशातलाच नाही, तर संपूर्ण आशिया खंडातील सर्वात मोठा कोरोना हॉटस्पॉट

पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. अशीच रुग्णवाढ राहिली तर आगामी काही दिवसांत परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  रुग्णसंख्या वाढल्यामुळे येथील आरोग्य प्रशासनाकडूनसुद्धा लसीकरण आणि कोरोना चाचाणीचा कार्यक्रम युद्धपातळीवर राबवला जातोय.
 
दरम्यान, महाराष्ट्र हा देशातलाच नाही, तर संपूर्ण आशिया खंडातील सर्वात मोठा हॉटस्पॉट म्हणून समोर येतोय. संपूर्ण पाकिस्तान देशात जेवढे रुग्ण आढळले त्यापेक्षा कितीतरी जास्त रुग्ण एकट्या पुण्यात आढळत आहेत. पाकिस्तानची एकूण लोकसंख्या 22 कोटी आहे. यापैकी पाकिस्तानात  फक्त 3495 नवे कोरोना रुग्ण आढळले. तर पुण्याची लोकसंख्या फक्त 1 कोटी असूनसुद्धा येथे कोरोनाचे तब्बल 4973 नवे रुग्ण आढळले. 
 
पुणे जिल्ह्यातील ही कोरोनास्थिती समोर आल्यानंतर पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणा चाचण्या केल्या जात नसतील अशी ओरड होऊ शकते. मात्र, हीच स्थिती मुंबईच्या बाबतीतसुद्धा लागू होतेय. एकट्या मुंबईमध्ये अनेक देशांच्या तुलनेत दुप्पट नवे कोरोना रुग्ण आढळत आहेत. 11 कोटी लोकसंख्या असलेल्या जपानमध्ये 1473 रुग्ण निघाले. 16 कोटी लोकसंख्या असलेल्या बांगलादेशमध्ये एकूण 2187 नवे कोरोना रुग्ण आढळले. साडे 3 कोटी नागरिक असलेल्या सौदी अरेबियात फक्त 381 नवे कोरोना रुग्ण सापडले. मात्र, एकट्या मुंबईत तब्बल 2877 कोरोना रुग्ण सापडले आहेत.