सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 20 मार्च 2021 (21:39 IST)

महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेग सुरूच 27 हजाराहून अधिक प्रकरणे नोंदली गेली

महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेग सुरु असून कोरोना झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 27,126 नवीन प्रकरणे नोंदली गेली. याच काळात कोरोना मुळे 92 लोकांचा मृत्यू झाला आहे. संक्रमणाचे वाढते प्रकरण लक्षात घेता राज्य सरकार पुन्हा एकदा कठोर उपाययोजना करण्यावर विचार करीत आहे.
वाढत्या घटनांमध्ये नागपूरमधील लॉक डाऊन वाढविण्यात आले आहे. आता लॉकडाऊन 31 मार्च पर्यंत वाढविण्यात आले आहे. या पूर्वी हे 15 मार्च ते 21 मार्च पर्यंत लावले गेले होते. मुंबई शिवाय नागपुरात देखील कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहे.  
 
महाराष्ट्रातील एकूण प्रकरणे : 24,49,147
बरे झालेले रुग्ण  : 22,03,553
मृत्युमुखी  : 53,300
सक्रिय  केस : 1,91,006