मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 10 मार्च 2021 (08:39 IST)

राज्यात मंगळवारी ९ हजार ९२७ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील काही जिल्ह्यात कडक निर्बंध जाहीर करण्यात आले आहेत. राज्यात मंगळवारी ९ हजार ९२७ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ५६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. असे असले तरी १२ हजार १८२ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत राज्यात २० लाख ८९ हजार २९८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन परतले आहे. राज्याचा रिकव्हरी रेट हा ९३.३४ टक्के इतका आहे. राज्यात आतापर्यंत १ कोटी ७० लाख २२ हजार ३१५ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यातील २२ लाख ३८ हजार ३९८ कोरोना चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. सध्या राज्यात ४ लाख ५७ हजार ९६२ लोक हे होम क्वारंटाईन आहेत. तर ३ हजार ८२७ लोक संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.
 
राज्यात ९५ हजार ३२२ अँक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. तर मुंबईत आतापर्यंत ३३ लाख ५५ हजार ५९५ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर मुंबईत सध्या ९ हजार ३३० अँक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. त्याचप्रमाणे ठाण्यात आतापर्यंत २८ लाख ७१ हजार १०६ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली असून १० हजार ३३७ अँक्टिव्ह रुग्ण ठाण्यात आहेत.
 
रायगड जिल्ह्यात सध्या १ हजार १८८ अँक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. तर सिंधुदूर्ग जिल्ह्यात सध्या २११ अँक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. पुण्यातही रुग्णसंख्या वाढत आहेत. आतापर्यंत पुण्यात ४२ लाख ४६ हजार ६५५ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर सध्या पुण्यात १८ हजार १३७ अँक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. नागपूरमध्येही कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नागपूरमध्ये सध्या ११ हजार ८११ अँक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. तर जळगावातही कोरोनाचा कहर पहायला मिळत आहे. जळगावात तीन दिवसांचा जनता कर्फ्यू लावण्यात आला आहे. जळगावात आतापर्यंत ६५ हजार ५६३ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर जळगावात सध्या ४ हजार ८८३ अँक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत.