गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 20 मार्च 2021 (22:17 IST)

गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा देवेंद्र फडणवीस यांनी मागणी केली

परमबीर सिंग यांनी आज राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वर केलेल्या गंभीर आरोपाने राज्यात गोंधळ उडाला आहे. या प्रकरणाला घेऊन भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.  
 
आज परमबीरसिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले होते त्यामध्ये त्यांनी गृहमंत्र्यांवर आरोप केले होते की गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे ला 100 कोटी रुपये वसूल करण्याचे टार्गेट दिले होते, या पत्र बाबत कळतातच राज्यात खळबळ उडाली आहे. या वर प्रतिक्रिया देत देवेंद्र फडणवीस यांनी हे सर्व प्रकार धक्कादायक असून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तात्काळ आपल्या पदावरून राजीनामा द्यावा आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तो स्वीकारावा. तसेच या प्रकरणांकडे दुर्लक्ष न करता योग्य तो निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यावा असेही ते म्हणाले.  
या प्रकरणाची केंद्रीय तपास यंत्रणा कडून कसून चौकशी व्हावी. आणि घडलेल्या प्रकरणामुळे गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा असे ही फडणवीस म्हणाले.