मंगळवार, 16 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 20 मार्च 2021 (16:29 IST)

मयत इसमाचा व मनसुख हिरेन प्रकरणाचा कोणताही संबंध नाही

no connection
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर सापडलेल्या संशयित स्कॉर्पिओ कारचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह ज्या ठिकाणी सापडला होता त्याच ठिकाणी खाडीत एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेतला असून सदर मृतदेह एका मजुराचा असल्याचे पोलीस तपासातून स्पष्ट झाले आहे.
 
शेख सलीम अब्दुल (वय 44, रा. रेतीबंदर, मुंब्रा) असे मयत मजुराचे नाव आहे. तो शौच करण्यास गेला असता त्याचा पाय घसरून खाडीत पडला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. 
 
मुंब्रा पोलीस, ठाणे पालिका आपत्ती व्यवस्थापन पथक व अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह खाडीतून बाहेर काढला. त्यानंतर काही वेळातच मृतदेहाची ओळख पटली. दरम्यान, सदर मयत इसमाचा व मनसुख हिरेन प्रकरणाचा कोणताही संबंध नाही, असे मुंब्रा पोलिसांनी स्पष्ट केले.