शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Modified: शनिवार, 20 मार्च 2021 (15:01 IST)

आंतरराष्ट्रीय आनंद दिनानिमित्त

आवडती वस्तू मिळाली की मिळतो आंनद,
चमचमीत खाल्ले, की होतो अत्यानंद,
कपडे पसंती चे देतात भरभरून आंनद,
पर्यटन करून आलो, की मनास आनंद,
गोड बातमी कानी आली, की घरात पसरतो आनंद,
पदरी पुण्य पडले, की मिळे परमानंद,
पण वाटता यायला हवा दुसऱ्यास ही आनंद,
वाटला की वाढतो चौपटी ने हा आंनद,
द्यावा अन घ्यावा असा हा एकमेव आनंद,
कधीही पडणार अपुरा, न राहील अपूर्ण आनंद,
सगळीकडे असावा,अन लाभावा आंनदी आंनद!!
.....अश्विनी थत्ते.