शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 16 मार्च 2021 (14:10 IST)

आजपासून 9 वर्षांपूर्वी सचिन तेंडुलकरने 100वे आंतरराष्ट्रीय शतक साकारले होते, अजूनही विक्रम कायम आहे

भारतीय क्रिकेटसाठी आजचा दिवस खूप खास आहे, कारण आजपासून 9 वर्षांपूर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 वे शतक झळकावून इतिहास रचला होता. सचिन तेंडुलकरने आशिया चषक 2012 च्या सामन्यात बांगलादेशविरुद्ध 12 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 114 धावा फटकावल्या. या सामन्यात टीम इंडियाने 50 षटकांत पाच गडी गमावून 289 धावा केल्या. तथापि, बांगलादेशने 50 षटकांत चार बळी टिपून 5 गडी राखून सामना जिंकला होता. सचिनने 100 व्या शतकासाठी अनेक सामन्यांची प्रतीक्षा केली होती. 
 
15 नोव्हेंबर 1989 रोजी पाकिस्तानविरुद्धच्या डेब्यू सामन्यापासून ते वानखेडे स्टेडियमवर 2013 मधील शेवटचा सामना होईपर्यंत सचिनला कोणीही स्पर्श करु शकला नाही. सचिन तेंडुलकरला भारतातील सर्वात मोठा नागरी सन्मान 'भारत रत्न' देखील देण्यात आला आहे. हा मान मिळवणारा तो पहिला क्रिकेटपटू आहे. त्याने आपल्या संपूर्ण कारकीर्दीत 200 कसोटी सामन्यांमध्ये 15,921 धावा तर 463 एकदिवसीय सामन्यात 18426 धावा केल्या. याशिवाय त्याने टी -20 आंतरराष्ट्रीय सामनाही खेळला होता, त्यात 10 धावा केल्या. कसोटी आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. सचिनच्या 24 वर्षांच्या अनेक अगणित नोंदींवरून असे दिसून येते की त्याला भारतात 'भगवान' हा दर्जा का देण्यात आला आहे. 
 
एकदिवसीय क्रिकेटमधील सचिनचे पहिले द्विशतक
क्रिकेटचे सर्व विक्रम आपल्या नावावर करणार्याभ सचिन तेंडुलकरने 24 फेब्रुवारी 2010 रोजी ग्वाल्हेर मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरूद्ध एकदिवसीय क्रिकेटमधील पहिले द्विशतक झळकावले होते. प्रत्येकजण त्याच्या खेळ आणि वयावर प्रश्न विचारत असताना त्याने 36 व्या वर्षी हा डाव खेळला. या सामन्यात सचिनने 147 चेंडूत 200 धावांची नाबाद खेळी खेळली. या सामन्यात भारताने 400 हून अधिक धावा केल्या आणि सामना 153 धावांनी जिंकला. याआधी एकदिवसीय क्रिकेटमध्ये वैयक्तिक धावांचा सर्वाधिक खेळी करण्याचा विक्रम पाकिस्तानी फलंदाज सईद अन्वरच्या नावावर होता. त्याने भारताविरुद्ध 194 धावांचा डाव खेळला होता.