रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 6 फेब्रुवारी 2021 (22:32 IST)

शरद पवारांचा सचिन तेंडुलकरला सल्ला, आपले क्षेत्र सोडून बाकी विषयांवर बोलताना काळजी घ्या

भारताचा सर्वोत्तम क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर ते लता मंगेशकर यांनी शेतकरी आंदोलनावर सरकारला अनुकूल ठरणारी भूमिका घेतली. त्यावर, पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले. त्यावेळी शरद पवारांनी सचिन तेंडुलकरला एक सल्ला दिला.
 
“लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकरांच्या प्रतिक्रियांवर अनेक सामान्य लोक तीव्र पणे होत आहेत. आपले क्षेत्र सोडून बाकी विषयांवर बोलताना काळजी घ्यावी असा माझा सचिनला सल्ला राहील.” असे शरद पवार म्हणाले.
 
“इतके दिवस कष्टकरी वर्ग रस्त्यावर बसला आहे. त्याचा विचार करायला पाहिजे. त्याचाच प्रतिसाद आंतरराष्ट्रीय स्तरावरून प्रतिक्रिया येत आहेत. सहानुभूती मिळते. हे खरं तर चांगलं नाही. आपले पंतप्रधान तिकडे बोलले होते. आता त्यांची प्रतिक्रिया येत आहे. शेतकऱ्यांना कधी खलिस्तानी म्हणतात कधी अतिरेकी म्हणतात. शेतकरी आंदोलनाला बदनाम करत आहेत” असे शरद पवार म्हणाले.
 
“शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी सरकारने पुढाकार घेण्याची गरज आहे. वरिष्ठ मंत्र्यांनी पंतप्रधान, संरक्षणमंत्री, गडकरी सारख्या नेत्यांनी पुढाकार घेतला, तर मार्ग निघण्याची शक्यता आहे. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांचा अनादर करण्याचा हेतू नाही” असे शरद पवारांनी सांगितले. “सर्वोच्च स्तरावर जर प्रयत्न केला, तर शेतकरी नेत्यांनी सुद्धा चर्चा करावी. स्वातंत्र्यानंतर कधी असं घडलं नाही. सरकारने ही टोकाची भूमिका घेतल्यावरुन त्यांचे धोरण स्पष्ट होत आहे. अन्नदाता जर रस्त्यावर बसतो. तर त्याला प्रतिसाद दिला पाहिजे” असे शरद पवार म्हणाले.