1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021 (15:36 IST)

सचिनचा भारतरत्न काढून घ्या, संभाजी ब्रिगेडने केली मागणी

sambhaji brigade
शेतकरी आंदोलनात सचिन तेंडुलकरने केंद्र सरकारचे समर्थन केल्यानेच सचिनवर टीकेची झोड उडाली आहे. त्यातच आता संभाजी ब्रिगेडने सचिनला लक्ष्य करत सचिनचा भारतरत्न काढून घ्या अशी मागणी केली आहे. भाजप समर्थनाचा हा करंटेपणा सेलिब्रिटी जमातीमध्ये दिसून आलेला आहे. शेतकऱ्याने जर शेतात नाही पेरल तर सेलिब्रिटी काय खाणार असा सवाल संभाजी ब्रिगेडने केला आहे. जर शेतकऱ्यांनी पेरा केला नाही, तर सेलिब्रिटी काय धतोरा खाणार का असेही संभाजी ब्रिगेडने विचारले आहे. 
 
सचिन तेंडुलकर जो गेले सहा वर्षे कुंभकर्णासारखा झोपला होता, कधीही संसदेत उपस्थित राहिला नाही, त्याने एक चकार संसदेच्या सभागृहात मांडला नाही. सचिनसारखे लोक जर जगाच्या पोशिंद्याच्या बाबतीत बोलत असतील तर हा करंटेपणा असल्याचे संभाजी ब्रिगेडने म्हटले आहे. भारतात संघाच्या लोकांची चापलूसी करायची आणि भारतरत्नसारखे पुरस्कार घ्यायचे. म्हणूनच सचिन तेंडुलकरचा भारतरत्न मागे घ्याला हवा अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.