मंगळवार, 2 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 27 जानेवारी 2021 (20:50 IST)

सौरव गांगुली यांना छातीत दुखू लागल्याने पुन्हा रुग्णालयात दाखल

Former India captain and BCCI president Sourav Ganguly admitted to hospital Virender Sehwag
भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांना छातीत दुखू लागल्याने पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
 
48वर्षीय गांगुली यांना काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. त्यानंतर त्यांना अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.
 
तिथे त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. त्यांची प्रकृती स्थिर असल्याने 7 जानेवारीला त्यांना घरी सोडण्यात आलं होतं. हॉस्पिटलमधून निघताना सौरव यांनी फोटो ट्वीट केला होता. मी ठीक असून, लवकरच कामाला लागेन असं त्यांनी हॉस्पिटलबाहेर बोलताना सांगितलं होतं.
 
सौरव यांची कोरोना चाचणीही निगेटिव्ह आली होती.
गांगुली तीन ते चार आठवड्यात दैनंदिन रूटीन सुरू करू शकतील असं डॉक्टर रुपाली बसू यांनी सांगितलं होतं.
 
काही दिवसांपूर्वी सौरव यांनी घरातल्या जिममध्ये व्यायाम करत असताना गांगुली यांना छातीत दुखू लागलं होतं. त्यानंतर त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.
 
गांगुली यांच्याबाबतचं वृत्त पसरताच सोशल मीडियावर गेट वेल सूनच्या सदिच्छांचा पाऊस पडला आहे. प्रिन्स ऑफ कोलकाता अशी बिरुदावली लाभलेले गांगुली भारतीय संघाच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक आहेत.
 
113 टेस्ट, 311 वनडेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलेल्या गांगुली यांनी मॅच फिक्सिंगचं झाकोळ भारतीय क्रिकेटवर असताना नेतृत्वाची धुरा हाती घेतली.
 
अव्वल संघांविरुद्ध, प्रतिकूल खेळपट्यांवरही जिंकू शकेल असा संघ तयार करण्याचं काम गांगुलीने केलं.
 
वीरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या बरोबरीने गांगुली यांनी अनोखं पंचक तयार केलं.
 
गांगुलीने असंख्य युवा खेळाडूंना संधी दिली. महेंद्रसिंग धोनी हे त्याचं उत्तम उदाहरण.
 
गांगुलीने विजयी संघाचा पाया रचला ज्यावर महेंद्रसिंग धोनी आणि नंतर विराट कोहली यांनी कळस चढवला आहे.
 
गांगुली यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.