बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Updated : शुक्रवार, 15 फेब्रुवारी 2019 (15:58 IST)

म्हातारपणात सर्वात जास्त होतात हे 3 आजार, 50 वर्षांचे झाले असाल तर सावध व्हा

म्हातारपणात मनुष्याला काही आजारपण जास्त त्रास देतात. हे आजार म्हातारपणाचे दुखणे अधिक वाढवतात. एक्सपर्टचे म्हणणे आहे की वाढत्या वयात मनुष्याच्या शरीराची प्रतिरोधक क्षमता कमी होऊ लागते आणि त्याला बरेच आजार होऊ लागतात. पण काही असे आजार आहे जे 50 वर्षाहून जास्त वयाच्या महिला आणि पुरुषांना सर्वात जास्त होतात. तर जाणून घेऊ कोणते गंभीर आजार आहे जे 50 वर्षांनंतर जास्त होतात.  
हृदय रोग  
सेंटर्स ऑफ डिजिज कंट्रोल एंड प्रीवेंशनचे म्हणणे आहे की अमेरिकेत हृदय रोग पहिल्या क्रमांकावर आहे जे म्हातार्‍यांमध्ये जास्त दिसून येतात. 50 वर्ष पूर्ण केल्यानंतर हा आजार वाढू लागतो. भारतीय म्हातार्‍यांमध्ये हे आजार जास्त प्रमाणात आढळून आले आहे.

कर्करोग
सेंटर फॉर डिजिज कंट्रोलचे म्हणणे आहे की हार्ट अटैकनंतर दुसर्‍या क्रमांकावर म्हातार्‍यांमध्ये होणारे आजार म्हणजे कर्करोग. अमेरिकेत हार्ट अटैकनंतर दुसर्‍या क्रमांकावर सर्वात जास्त मृत्यू कर्करोगमुळे होते. 50 वर्षांनंतर पुरुषांमध्ये लंग कर्करोगाचा धोका वाढू लागतो. तसेच महिलांमध्ये या वयात सर्वात जास्त स्तन कर्करोगाचे लक्षण दिसू लागतात. फुफ्फुस आणि स्तन कर्करोग नंतर पोटाचा आणि प्रोटेस्टेट कर्करोगचा धोका वाढू लागतो.  
स्ट्रोक
स्ट्रोक मस्तिष्क संबंधी आजारांमध्ये सर्वात सामान्य आजार आहे. अमेरिकेत हार्ट अटॅक आणि कर्करोगानंतर सर्वात जास्त रुग्णांची मृत्यू या आजारामुळे होते. हे आजार सर्वात जास्त म्हातार्‍या लोकांना प्रभावित करते.