मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By

5 आजारांशी लढायला मदत करते तुती(शहतूत)

उन्हाळा सुरु झाला आहे, बाजारात नवीन नवीन फळे येण्यास सुरवात झाली आहे. जसे की, टरबूज, खरबूज, तुती(शहतूत) चे वातावरण असते. छोटासा दिसणारा तुती(शहतूत) खूप लाभदायक असतो. तुती(शहतूत)  भलेही 1 किंवा 2 महिन्यासाठीच मिळते. पण याचे आरोग्यदायी फायदे खूप आहे. 
 
पोटाचे आजार, नर्वस सिस्टीम, डायबिटीससाठी तुती(शहतूत)  फायदेशीर मानले जाते. चवीला आंबट-गोड तुती(शहतूत)  खातांना खूप टेस्टी लागते. यामध्ये अनेक पोषकतत्वे असतात. तुती(शहतूत)  मेडिसिनल प्रॉपर्टीजचा खजाना मानले जाते. आयुर्वेदात तुती(शहतूत)  चा उपयोग अनेक प्रकारचे आजार दूर करण्यासाठी केला जातो. तुती(शहतूत)  मध्ये असलेले पोषकतत्वे आजाराशी लढायला मदत करतात. तुती(शहतूत) मध्ये सायनाइडिंग, ग्लूकोसाइड नावाचे फाइटोन्यूट्रिएंट्स असते. जे रक्तातील वेस्ट प्रोडक्ट्सला फिल्टर करते. तसेच ब्लड सर्कुलेशन नियंत्रित ठेवते. 
 
तुती(शहतूत) खाण्याचे फायदे 
मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी तुती(शहतूत) गुणकारी मानले जाते. याच्या सेवाने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. 
 
तुती(शहतूत)  मध्ये असलेले पोषकतत्वे शरीरात इन्सुलिनच्या गतीला वाढवतात यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळते. 
 
तुती(शहतूत) पोटासाठी आरोग्यदायी मानले जाते. तुती(शहतूत) सेवनाने बद्धकोष्ठता दूर होते. 
 
तुती(शहतूत) डोळ्यांसाठी देखील आरोग्यदायी मानले जाते. तसेच याच्या सेवनाने चेहरा उजळतो तसेच तणाव दूर होतो. तसेच केसांचे आरोग्य वाढते. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik