Festival Posters
✕

घरी देखील ऑफिसमधील ताण येतो का?

Updated: मंगळवार, 25 सप्टेंबर 2018 (17:36 IST)
 
पण हे दोन्हीही ताण एकमेकांपासून वेगवेगळे कसे ठेवावे, हे माहीत असायला हवे. पण अनेकांना ते जमत नाही. मग ऑफिसमधून घरी गेल्यावरही ऑफिसमधील टेंशन्स डोक्याभोवती फे धरू लागतात. दुसर्‍या दिवशी ऑफिसमध्ये काय होईल याची चिंता सतावू लागते. पण या काही टिप्सने तुम्ही पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफमधील ताळमेळ योग्य प्रकारे साधू शकता.
 
* सर्वात आधी एक मर्यादा आखून घ्या. स्पर्धा सोपी नसली तरी ऑफिसचे काम घरी नेऊन करु नका. यामुळे तुमचा वर्क लाइफ बॅलन्स बिघडेल. तसेच ऑफिसचे काम घरी आणल्याने त्यासोबत टेन्शनही येणारच. परिणामी पर्सनल लाइफवर त्याचा परिणाम होणार. म्हणून शक्यतो ऑफिस काम ऑफिसमध्ये संपवा. 
 
* ऑफिसमधून निघाल्यावर आपल्याला काय काय काम करायचे आहे, याचा विचार करा आणि त्याप्रमाणे दुसर्‍या दिवशीची योजना आखा. त्यामुळे घरी जाऊन कामाचा ताण जाणवणार नाही. 
 
* वेळेचे नियोजन नीट करा. तुमच्या क्षमतेनुसार ठरवलेल्या वेळेत काम पूर्ण करा. त्यामुळे तुम्हाला ताण येणार नाही. अनेकदा काम वेळेत पूर्ण न झाल्याने ताण येतो. तर काम टाळण्याच्या सवयीमुळे काम अधिक वाढते. त्यामुळे वेळेचे नियोजन महत्त्वाचे. 
 
* ऑफिसमध्ये असताना सोशल मीडियापासून दूर राहा. कारण यात किती वेळ जातो, याचा अंदाज लागत नाही. त्याचबरोबर त्याचा परिणाम कामावरही होतो, हे लक्षात येत नाही. त्यामुळे ऑफिसमध्ये काम करताना सोशल मीडियाचा वापरटाळा. 
 
* मॅनेजर किंवा बॉसने एक्सट्रा काम दिल्यास ते करणे शक्य नसल्यास स्पष्ट नकार द्या. कारण यामुळे कदाचित तुमच्या करिअरवर चांगला परिणाम होईल, पण त्यामुळे तुम्ही कामात अधिक गुंग होता. टेन्शन वाढते आणि पर्सनल लाइफवर त्याचा परिणाम होतो.
- जयश्री काळे 

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

अकबर-बिरबलची कहाणी : खर्चाची अट

उपवासासाठी ५ प्रकारच्या सोप्या आणि चविष्ट चटण्या Easy Upvas Chutney Recipes

रजोनिवृत्तीच्या आसपास हाडांची काळजी कशी घ्यावी? आहार आणि व्यायामाचे महत्त्व

Happy Dussehra Images 2026 दसरा शुभेच्छा मराठी इमेजेस

मुलींसाठी दुर्गा देवीची मॉडर्न यूनिक नावे, आयुष्यभर देवीचा आशीर्वाद मिळेल

पुढील लेख
Show comments