मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 17 सप्टेंबर 2018 (15:04 IST)

अनूप जलौटा गर्लफ्रेंड सोबत बिगच्या घरात

रिॲलिटी शो असलेल्या बिग बॉसचं १२ वे सीझन शोमध्‍ये भजन गायक अनूप जलौटा आहेत. हा शो फॅमिलीसाठी करण्‍याचा मानस होता, जेणेकरून घरातील सर्व लोक हा शो पाहू शकतील. म्‍हणून भजन सम्राट अनूप जलोटा यांना या शोसाठी बोलवण्‍यात आले आहे. बिग बॉसच्‍या घरात राहण्‍यासाठी आठवड्‍याला ४५ लाख रुपये मिळणार आहेत. अनूप जलोटा हे बिग बॉसचे सर्वांत महागडे आणि सर्वांत अधिक वय असणारे स्‍पर्धक आहेत.
 
यावेळी अनूप जलोटा यांनी खुद्‍द खुलासा केला की, त्‍यांच्‍यापेक्षा ३७ वर्षांनी लहान असणारी जसलीन मथारू सोबत ते रिलेशनशीपमध्‍ये आहेत. या खुलाशानंतर लोक अनूप जलोटा आणि जसलीनला सोशल मीडियावर ट्रोल करण्‍यास सुरूवात केली. ज्‍यावेळी जलोटा यांनी स्‍वत: बिग बॉसमध्‍ये हा खुलासा केला, सलमान खानला देखील विश्वास बसला नाही. काही सोशल मीडिया युजर्सनी जसलीन मथारू अनुप यांची गर्लफ्रेंड असल्‍याचे म्‍हणत मीम्‍सही तयार केले आहेत.