सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Updated : मंगळवार, 25 जानेवारी 2022 (22:54 IST)

इंसुलिनची शंभर वर्षे

डॉ अमित सराफ MD FRCP (London, Edinburgh, Glasgow) FACP (Phily) FICP FCPS
डायरेक्टर इंटरनल मेडिसिन ज्युपिटर हॉस्पिटल
सध्याचे वर्ष हे वैद्यकीय क्षेत्रासाठी खूप खास आहे, कारण त्याच्या काळातील सर्वात मोठे वैद्यकीय यश संपादन केलेल्या इंसुलिनच्या शोधाचे हे शताब्दी वर्ष आहे. या शोधामुळे सर फ्रेडरिक बॅंटिंग यांना आंतरराष्ट्रीय हिरोचा दर्जा बहाल करण्यात आला, तसेच नाइटहूड आणि नोबेल पारितोषिकांसह असंख्य पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. १९२३ मध्ये वयाच्या ३२ व्या वर्षी नोबेल पारितोषिक पटकावणारे बॅंटिंग, फिजियोलॉजी किंवा वैद्यकीय क्षेत्रातील आजपर्यंतचे सर्वात तरुण नोबेल पारितोषिक विजेते आहेत.
 
इन्सुलिनचा शोध लागण्यापूर्वी, टाइप १ मधुमेहाचे निदान म्हणजे मृत्यूदंडाची शिक्षा होती. यामध्ये सामान्यत: किशोरवयीन मुले बळी पडत असत, आधिक वजनाची समस्या, जास्त तहान तसेच भूक लागणे आणि ग्लुकोसुरिया सारख्या समस्या त्यांना होत् असत. यांवर एकमात्र कॅलरी-प्रतिबंधित आहार हाच प्रभावी उपचार होता, ज्यामुळे शरीरात कर्बोदकांची कमतरता निर्माण झाल्याने, रूग्ण अखेरिस हायपरग्लाइसेमिया आणि कोमा चा शिकार होत असत. बॅंटिंगच्या कार्याच्या आधीच्या तीन दशकांतील सखोल संशोधनाने स्वादुपिंडातील लॅन्गरहॅन्सच्या आइलेट्सची सर्वप्रथम ओळख झाली. रक्तातील ग्लुकोजचे नियमन करण्यासाठी आंतरिक स्रावाचे स्त्रोत म्हणून ते ओळखले जाऊ लागले. त्या आधारे, अनेक संशोधक गटांनी मधुमेही कुत्र्यांमधील ग्लुकोसुरिया कमी करण्यासाठी स्वादुपिंडाच्या कच्च्या अर्काची क्षमता प्रदर्शित केली होती, परंतु अर्कातील अशुद्धतेमुळे उद्भवणारे दुष्परिणाम क्लिनिकल चाचण्यांपर्यंत प्रगती करू शकले नाहीत. 
 
दरम्यान, मॅक्लॉड नामक सर्जन, जे कार्बोहायड्रेट चयापचयातील तज्ञ होते, ते बॅंटिंगच्या कार्यक्षमतेकडे प्रभावित झाले. मॅक्लॉडने बॅंटिंगला संशोधनासाठी प्रयोगशाळा, कुत्रे आणि मदतीसाठी चार्ल्स बेस्ट नामक विद्यार्थी पुरवला. सुरुवातीच्या प्रयोगांच्या आशादायक परिणामांमुळे मॅक्लॉड निधी वाढवण्यास प्रेरित झाले, त्यानंतर बायोकेमिस्ट जेम्स कॉलीपची अंतर्गत स्रावाच्या यशस्वी शुद्धीकरणावर देखरेख करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली. पुढे जाऊन त्या स्त्रावाला मॅक्लॉडने इन्सुलिन असे नाव दिले, स्वादुपिंडाच्या आयलेट्सचा संदर्भ घेत, लेटीन मध्ये इन्सुला, म्हणजेच बेट असा त्याचा अर्थ होतो. 
 
एखाद्या संशोधनासाठी त्याला आवश्यक असलेल्या विचारांची जोड खूप महत्त्वाची असते, ती मिळाल्यानंतर त्याच्या निर्मितीची आवश्यकता असते. विचारांना वैज्ञानिक यशाचे शिखर मानले जाते, कारण ते एका व्यक्तीच्या कल्पनेतून निर्माण झालेले असतात, व्यक्तिच्या अंतर्दृष्टीशिवाय ते कुठेही अस्तित्वात नसतात, जसे की आइनस्टाईनचा सापेक्षता सिद्धांत किंवा नैसर्गिक निवडीद्वारे डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत. इंसुलिनचा शोध आणि डीएनएची रचना हे देखील गहन विचारांचे विषय होते, ज्याचा प्रत्येक संशोधन गट शोध घेत होता. त्यामुळे जर बॅंटिंग, प्रोफेसर जेम्स वॉटसन आणि प्रोफेसर फ्रान्सिस क्रिक त्यांच्या प्रयत्नात अपयशी ठरले असते, तर इन्सुलिनच्या बाबतीत आणि डीएनए सह त्याचे यश, एक वर्षाच्या आत कींवा काही वर्षांतच कोणा इतरांना मिळाले असते, स्मॉलपॉक्स लस, प्रतिजैविक, ऍनेस्थेसिया, ओरल काँट्रासेप्टीव आणि केमोथेरपी यासारख्या अलीकडील वैद्यकीय शोधांच्या तुलनेमध्ये इंसुलिनचा शोध सर्वात महत्वपूर्ण ठरला. कारण, हा शोध यापुर्वी कोणत्याही संशोधकाला सहज समजू शकणाऱ्या सरळ तत्त्वावर आधारित होता: स्वादुपिंडातील लॅन्गरहॅन्सचे आयलेट्स रक्तातील ग्लुकोजचे स्तर नियंत्रित करणारे अंतर्गत स्राव (इन्सुलिन) तयार करतात. स्वादुपिंडातील इन्सुलिनच्या अपुर्‍या उत्पादनामुळे हायपरग्लेसेमिया हा मधुमेहाला कारणीभूत ठरणारा घटक लक्षात घेता, योग्य तयारीद्वारे स्वादुपिंडाच्या अर्कांतील इन्सुलिन वेगळे करून, त्याचा उपयोग मधुमेहाच्या रूग्णांवर केला जाऊ शकतो. या साध्या ढोबळ कल्पनेवर आधारित संशोधन आणि मधुमेहावर उपचार करण्यासाठी प्रभावी उपचार विकसित करण्याची तातडीची गरज यामुळे १९२० साली तब्बल ४०० संशोधन गटांनी स्वतःला वाहून घेतले होते. त्यांपैकी ज्यांनी इन्सुलिन वेगळे करण्याचा प्रयत्न केला. ते सर्व अपयशी ठरले. याचे कारण म्हणजे , अनेक संशोधकांना गोंधळात टाकणारा एक घटक म्हणजे बाह्य स्रावामुळे इन्सुलिनची अवनती होणे, स्वादुपिंडातील शुद्धीकरण प्रक्रिया एकसंध लागू होण्यापूर्वी बाह्य स्रावापासून इन्सुलिन वेगळे करण्याचे साधन आवश्यक होते. ही संकल्पना चुकीची होती, कारण बाह्य स्राव स्वादुपिंडात निष्क्रिय स्वरूपात साठवला जात होता, परंतु संशोधकांनी बाह्य अर्क काढून टाकण्याच्या पद्धती विकसित करण्याचा निष्फळ प्रयत्न केल्यामुळे प्रगती होण्यास विलंब झाला.
 
हा संपूर्ण लेख या संशोधन प्रकल्पाच्या मार्गातील अक्षमता, अपयश, अज्ञान, संघर्ष, गैरसमज, संशय, भीती आणि अखेर विजय यावर प्रकाश टाकतो. ह्या मूळ प्रवासात बॅंटिंगचा महत्वपूर्ण संघर्ष होता. मात्र बँटिंगच्या मते याचे सारे श्रेय मॅक्लिओड घेत होते, यात मॅक्लिओडने कोणतेही प्रयोग केले नाहीत हे खरे जरी असले तरी, त्यांनी या प्रकल्पासाठी निधी दिला होता. तसेच प्रकल्पासाठी समर्थक आणि मार्गदर्शक म्हणून त्यांनी धुरा सांभाळल्यामुळे काँफरन्समध्ये संशोधनाचा डेटा सादर करताना त्यांच्या नावाचा समावेश न्याय्य देखील होता.
 
यामुळे बॅंटिंगच्या मनात खदखदत असलेल्या रागाचे द्वेषात रूपांतर झाले आणि गटातील अंतर्गत संबंध पुर्णतः बिघडले. त्यात, बॅंटिंगचा अंतिम अहंकार दुखावला गेला तो जेम्स कॉलिप्स यांच्या अर्कशुद्धीकरणाला मिळालेल्या यशामुळे, जेथे ते अयशस्वी झाले होते. नोबेल पारितोषिक पुरस्कारांशी संबंधित वाद सर्वसामान्य आहेच, परंतु नामांकन प्राप्त व्यक्तीने सहकार्‍यासोबत पुरस्कार वाटून देण्याच्या निषेधार्थ पुरस्कार नाकारण्याची ही असामान्य घटना असेल ! चार्लटन मैकलॉड सोबत श्रेय शेअर करण्यापेक्षा विज्ञानातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्काराचा त्याग करणे
बँटींग यांनी पसंत केले. मात्र , काऊंसिलरच्या सजगतेने टोरंटो महाविद्यालयाच्या प्रतिष्ठेसाठी त्यांनी ह्या पुरस्काराचा स्विकार केला, शिवाय या पुरस्काराचे श्रेय सर्व श्रेष्ठांसोबत वाटून घेतले.
 
बॅंटिंग यांचा वारसा कोणता होता?
शहरी जीवनाशी जुळवून घेण्यात अडचण असलेला एक देशी मुलगा म्हणून बँटींग यांचे वर्णन केले जाते. ते एक संघर्षवादी योद्धा होते, अगदी निःस्वार्थपणे आपल्या सहका-यांना मदत करण्यासाठी त्यांनी स्वतःला समर्पित केले होते. एक सच्चा आणि संशोधक म्हणून भोळे जरी असले तरी, मधुमेहाबद्दलच्या त्यांच्या संकल्पनेने वैद्यकिय विश्वाचे सोने केले, ज्यामुळे इन्सुलिनचा शोध लागला. मात्र , त्यांच्या या शोधाचा आणि त्यामुळे वाचलेल्या असंख्य जीवांचा ते आनंद घेऊ शकले नाहीत, त्यानंतर कर्करोग संशोधनाच्या क्षेत्रात, आपल्या या यशाची पुनरावृत्ती करण्याचा
त्यांचा प्रयत्न असफल झाल्यामुळे ते निराश झाले. १९४१ मध्ये विमान चिकित्सना संबंधी अभ्यासाचा भाग म्हणून इंग्लंडमध्ये गुप्त लष्करी मोहिमेदरम्यान त्यांचा विमान अपघातात मृत्यू झाला.
 
आपण या लेखांतर्गत फ्रेडरिक बॅंटिंग यांच्या कारकीर्दीचा फेरविचार करत आहोत. टोरंटोमधील मधुमेही रूग्णांमध्ये इंसुलिनचा शोध लागण्यापुर्वीच्या स्थितींसोबत आज ही दोन हात करण्याची ताकद आहे. कारण सध्याचे रूग्ण अशा वाईट आणि क्षीण अवस्थेत पोहोचण्यापूर्वीच इंसुलिनचा उपचार घेतात. अशाप्रकारे इंसुलिनचा उपचार घेणारे टेडी रायडर आणि एलिझाबेथ ह्यूजेस हे पहिले रूग्ण आहेत, ज्यांना पुनर्जीवन प्राप्त झाले. १९२२ मधील असा कोणताही रूग्ण, रूग्णाचे नातेवाईक किंवा डॉक्टर नाहीत, जे हे मान्य करणार नाही की, इन्सुलिन थेरपी म्हणजे
चमत्काराशिवाय दुसरे काही आहे!