शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: मंगळवार, 8 फेब्रुवारी 2022 (18:46 IST)

Paracetamol: सतत पॅरासिटमॉलच्या गोळ्या घेतल्याने ब्लडप्रेशर वाढून हार्ट अॅटॅकचा धोका होऊ शकतो

जे लोक उच्च रक्तदाबाचा त्रास असूनही पॅरासिटमॉलच्या गोळ्या घेत आहेत त्यांना हार्ट अटॅक आणि पक्षाघाताचा त्रास होऊ शकतो अशी भीती एका अभ्यासानंतर व्यक्त करण्यात आली आहे.
 
अनेक महिने रुग्णाला या गोळ्या घ्यायला सांगताना त्यांच्या सर्व फायद्या-तोट्यांचा विचार डॉक्टरांनी केला पाहिजे, असं एडिनबर्ग विद्यापीठातील संशोधक म्हणतात.
 
तसंच, डोकेदुखी आणि तापावर पेनकिलर घेणं सुरक्षित असतं, पण त्यानं ताण येतो.
 
काही तज्ज्ञांच्या मते, या सगळ्याच्या निष्कर्षांवर पोहोचण्यासाठी आणि या निष्कर्षांना दुजोरा देण्यासाठी आणखी काही काळ संशोधनाची आवश्यकता आहे.
 
वेदनांवर अल्पकालीन उपाय म्हणून पॅरासिटमॉलचा जगभरात मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. दीर्घकाळ पॅरासिटमॉलचा वापर फायद्याच ठरतो, असा कोणताही पुरावा नसतानाही तीव्र वेदनांसाठी या पॅरासिटमॉलचा वापर करण्याचा सल्ला दिला.
स्कॉटलंडचं उदाहरण घेऊ. या देशात लाखो लोकांना, म्हणजे स्कॉटलंडमधील प्रत्येक 10 माणसांपैकी एका माणसाला पॅरासिटमॉल घेण्याचा सल्ला देण्यात आला होता. 2018 सालातली ही आकडेवारी आहे.
यूकेमध्ये प्रत्येक तीन लोकांपैकी एकाला रक्तदाबाचा (Blood Pressure) त्रास होतो.
 
अशा 110 जणांचं सर्वेक्षण करण्यात आलं. यापैकी दोन तृतीयांश लोक एकतर हायपरटेन्शनवरील औषधं घेत होती किंवा रक्तदाबासाठीची औषधं घेत होती.
 
एका चाचणीदरम्यान या लोकांना दोन आठवडे दिवसातून चार वेळा एक ग्रॅम पॅरासिटमॉल सेवन करण्यास सांगण्यात आलं. त्यानंतर प्लेसेबो किंवा जिला डमी गोळी म्हणू शकतो, अशी गोळी तेवढ्याच कालावधीसाठी म्हणजे पुढच्या दोन आठवड्यात देण्यात आली.
 
या चाचणीतून असं समोर आलं की, पॅरासिटमॉलमुळे रक्तदाब वाढला. 'हृदयविकार आणि स्ट्रोकसाठी कारणीभूत ठरणारा सर्वात मोठा घटक' म्हणून रक्तदाबाकडे पाहिलं जातं. ही माहिती एडिनबर्ग क्लिनिकल फार्माकोलॉजिस्ट प्रो. जेम्स डिअर यांनी दिली.
 
संशोधकांनी डॉक्टरांना सांगितलंय की, तीव्र वेदना असलेल्या रुग्णांना पॅरासिटमॉलचा शक्य तितका कमी डोस घेण्याचा सल्ला दिला आहे. उच्च रक्तदाब असलेल्या आणि हृदयविकाराचा धोका असलेल्यांवर बारीक नजर ठेवा.
 
डोकेदुखी किंवा ताप यांच्यावर अल्पकाळासाठी पॅरासिटमॉलचा वापर ठीक आहे, असं NHS लोथियनमध्ये क्लिनिकल फार्माकोलॉजी कन्सल्टंट असलेले डॉ. इयान मॅकइनटायर यांनी म्हटलंय.
 
'अनेकजण अज्ञात'
लंडन विद्यापीठाच्या सेंट जॉर्जमधील क्लिनिकल फार्माकोलॉजीचे व्याख्याते डॉ. दीपेंदर गिल म्हणतात की, स्कॉटिश लोकांमध्ये रक्तदाबात छोटी, पण लक्षणीय वाढ दिसून आलीय. तसंच, अनेकजण अजूनही अज्ञात आहेत.
 
"सर्वप्रथम पॅरासिटमॉलच्या दीर्घकाळ वापराने रक्तदाबात झालेली वाढ कायम राहील की नाही हे अद्याप स्पष्ट नाही. दुसरे म्हणजे, पॅरासिटमॉलच्या वापरामुळे रक्तदाब वाढल्यास हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी रोगाचा धोका वाढतो की नाही हे निश्चितपणे सांगता येत नाही," असं ते म्हणतात.
अमेरिकेत नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात हृदयविकाराचा धोका आणि पॅरासिटमॉलमध्ये संबंध असल्याचे समोर आले होते. मात्र, हे निष्कर्ष सर्वांनाच लागू होऊ शकतील का, याबाबत अद्याप शंका आहे.
 
इतर बारीक-सारीक अभ्यासांमधून मात्र या दोन्हींमध्ये संबंध असल्याचे अद्याप स्पष्ट झालं नाहीय.
 
एडिनबर्ग टीमच्या मते, ते पॅरासिटमॉलमुळे रक्तदाब वाढतो, हे सविस्तर सांगू शकत नाही. मात्र, अभ्यासात ज्या गोष्टी आढळल्या, त्यानुसार पॅरासिटमॉलच्या दीर्घकालीन वापराबाबत पुनर्विचार केला पाहिजे.
 
हे पूर्वी नॉन-स्टिरॉइडल अँटी-इंफ्लॅमेटरी पेनकिलरपेक्षा सुरक्षित मानलं जात होतं, जसे की Ibuprofen, ज्यामुळे काही लोकांमध्ये रक्तदाब वाढल्याचं मानलं गेलं.
 
'द ब्रिटिश हार्ट फाऊंडेशन'च्या मते, डॉक्टर आणि रुग्णांनी त्या प्रत्येक औषधाबद्दल पुनर्विचार करण्याची आवश्यकता आहे, जे पॅरासिटमॉलसारखे घातक ठरू शकतात.
 
स्ट्रोक असोसिएशनचे डॉ. रिचर्ड फ्रान्सिस म्हणतता की, "पॅरासिटमॉल वापराचे धोके आणि फायदे याबाबत सामान्य आणि निरोगी रक्तदाब असलेल्या लोकांमध्ये दीर्घ कालावधीसाठी संशोधन आवश्यक आहे."