शुक्रवार, 31 मार्च 2023
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified सोमवार, 31 जानेवारी 2022 (18:59 IST)

आता कमी किंमतीत होणार गुढघ्याची शस्त्रक्रिया; आर्थिक दुर्बल घटकांसाठी याचा फायदा

गेल्या काही वर्षांपासून मसिना हॉस्पिटल आणि रोटरी क्लब ऑफ बॉम्बे नॉर्थ अनेक प्रकल्पांमध्ये जोडले गेले आहेत ज्यापैकी एक म्हणजे समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना परवडणाऱ्या संपूर्ण गुडघा बदलण्याच्या शस्त्रक्रियेच्या स्वरूपात गतिशीलता प्रदान करण्याशी संबंधित आहे.
 
मसिना हॉस्पिटलमध्ये ही शस्त्रक्रिया रु. केवळ 1 लाखांमध्ये केली जाते, ज्यामध्ये उच्च-गुणवत्तेचे इम्प्लांट आणि अल्ट्रा-आधुनिक लॅमिनार एअर फ्लो ऑपरेशन थिएटरमध्ये दिलेली सर्वोत्तम काळजी आणि पोस्ट सर्जरीसह घरगुती फिजिओथेरपी उपचारांचा समावेश आहे.
 
मसीना हॉस्पिटलच्या ऑर्थोपेडिक शल्यचिकित्सकांच्या तज्ञ पॅनेलद्वारे एकूण 100 हून अधिक गुडघा बदलण्याच्या शस्त्रक्रिया केल्या गेल्या आहेत आणि त्याचे परिणाम अत्यंत समाधानकारक आहेत. संधिवात आणि वेदनांमुळे अपंग झालेल्या अनेक लोकांना, तरुण आणि वृद्धांना राहत मिळाली आहे आणि पूर्वीसारखेच चालण्यास आणि काम करण्यास हि आता सक्षम आहेत.
 
प्रगत तंत्रज्ञान, भूल देण्याची आधुनिक शस्त्रक्रिया आणि पुनर्वसनाच्या आधुनिक तंत्रांमुळे उत्कृष्ट वैद्यकीय परिणामांसह कमीतकमी वेदना आणि हॉस्पिटल मधून लवकर डिसचार्ज मिळणे शक्य झाले आहे.
 
मसिना हॉस्पिटलच्या सीईओ, डॉ. विस्पी जोखी म्हणाल्या, “रुग्ण त्यांच्या समस्या मोठ्या प्रमाणात आमच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन येत असतात. आम्ही मसिना येथे गुडघ्याच्या आर्थ्रोप्लास्टी शस्त्रक्रियेमध्ये प्रभुत्व मिळवले आहे, ज्यामुळे शास्तक्रियेतील अस्वस्थता त्वरित कमी होते आणि गंभीरपणे खराब झालेल्या गुडघ्याच्या सांध्याचे कार्य पुनर्संचयित होते. तुमच्या मांडीचे हाड, शिनबोन, गुडघ्यापासून खराब झालेले हाडे आणि कूर्चा कापून ते धातूचे मिश्रण, उच्च दर्जाचे रेझिन आणि पॉलिमर असलेले कृत्रिम सांधे (प्रोस्थेसिस) बदलणे हे आमच्या टीमचे कौशल्य आहे.”
 
या प्रशंसनीय उपक्रमासाठी जागतिक अनुदान मिळाल्याबद्दल मसिना हॉस्पिटल रोटरी क्लब ऑफ बॉम्बे नॉर्थ आणि त्याच्या प्राथमिक देणगीदारांचे आभारी आहे. लाभार्थ्यांनीही याबाबत माहिती दिली आणि आमच्या सल्लागार डॉक्टरांनी स्वेच्छेने या धर्मादाय शस्त्रक्रिया केल्या. रूग्णांना सुलभ, किफायतशीर आणि सुरक्षित आरोग्य सेवा प्रदान करणे सुरू ठेवण्यासाठी रूग्णालय सज्ज आहे.