शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Updated : बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (20:57 IST)

जिभेचा काळा रंग असू शकतो धोकादायक, जिभेच्या रंगावरून जाणून घ्या तुमच्या आरोग्याची स्थिती

jeebh
जीभ आरोग्याविषयी खूप काही सांगते. जिभेच्या रंगात जरा बदल तुम्हाला तुमच्या आरोग्याची कल्पना देऊ शकते. जिभेचा रंग बदलण्यामागे अनेक कारणे असू शकतात तसेच जिभेच्या रंगावरून तुम्ही अनेक प्रकारच्या रोगांचा अंदाज देखील लावू शकता. अनेक वेळा औषधांमुळे तर काही वेळा अन्नामुळे काही काळासाठी जिभेचा रंग बदलतो. परंतु जर तुमच्या जिभेचा रंग बराच काळ बदलेला असेल तर समजून घ्या की समस्या आहे. 
 
साधरणपणे जिभेचा रंग कसा असावा?
साधारणपणे जिभेचा रंग हलका गुलाबी असावा. त्यावर हलका पांढरा लेप असला तरी सामान्य स्थिती समजू शकता.

जर जिभेचा रंग पांढरा दिसत असेल तर तोंडी स्वच्छता बरोबर होत नसल्याचे लक्षणं आहे. तसेच डिहायड्रेशनची समस्या सुद्धा समजते. फ्लूमुळे अनेकदा जिभेचा रंग पांढरा होतो.

पण जिभेचा रंग काळा असणे हे कर्करोगासारख्या गंभीर आजाराचे लक्षण देखील असू शकते. शिवाय अल्सर किंवा फंगल इन्फेक्शन असल्यास जिभेचा रंग काळा होतो. अनेकदा धुम्रपान करणाऱ्यांच्या जिभेचा रंगही काळा असतो. तर तोंडाच्या अस्वच्छतेमुळे बॅक्टेरियामुळे देखील जिभेचा रंग काळा होऊ लागतो.
 
शरीरात पौष्टिक घटकांची कमतरता असल्यास जीभ पिवळी दिसू लागते. शिवाय पचनसंस्थेतील अडथळे, यकृत किंवा पोटाच्या समस्यांमुळे देखील रंग बदलतो.
 
शरीरात फॉलिक अॅसिड किंवा व्हिटॅमिन बी-12 ची कमतरता असल्यास जिभेचा रंग विचित्र पद्धतीने लाल होऊ लागतो.
 
जांभळा रंगाची जीभ हृदयाशी संबंधित समस्यांकडे संकेत देते. रक्तातील ऑक्सिजन कमी होऊ लागल्यास जिभेचा रंग निळा किंवा जांभळा होतो.