बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: मंगळवार, 25 मे 2021 (08:45 IST)

रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी लोक या 7 उपायांचा अवलंब करीत आहे

सध्या च्या काळ्यात लसीकरण करणे, मास्क लावणे,सामाजिक अंतर राखणे ,वारंवार हात धुणे, आणि आपली प्रतिकारक शक्ती मजबूत करण्यात लोक लागले आहेत. हे  कोविड 19 कोरोना विषाणूसारखे साथीचा रोग टाळण्याचा योग्य मार्ग मानला जात आहे . लोक प्रतिकारशक्ती बळकट करण्यासाठी अनेक उपायांचा अवलंब करीत आहेत.आपण देखील डॉक्टरांचा सल्ल्यानुसार हे उपाय अवलंबवू शकता. 
 
1 फळे व आहार: रोगप्रतिकार शक्ती बळकट करण्यासाठी लोक शाकाहारी आणि सात्विक आहार तसेच दूध, दही, तूप, लोणी, मध, तुती, हिरव्या पालेभाज्या, नारळ, खडी साखर , खीर, पंचमृत, सुके मेवे, अंकुरले धान्य , मौसंबी,संत्री, नारळपाणी, लिंबाचा रस, काढा, केळी , सफरचंद इत्यादींचे सेवन केले जाते. काही लोक कांदा आणि लसूण खाण्याची देखील शिफारस करत आहेत. यावर पर्याय म्हणून बरेच लोक लिंसी ,मल्टीव्हिटामिन गोळ्या देखील घेत आहेत,  ते कितपत योग्य आहे हे आम्ही सांगू शकत नाही.
 
2  योग: बर्‍याच लोकांनी आता योगाला आपल्या दैनंदिन कामात समाविष्ट केले आहे. प्राणायाम आणि सूर्य नमस्कार सध्या  योगामध्ये खूप प्रभावी मानले जात आहे .
 
3 काढा - आयुष मंत्रालयाने सांगितल्यानुसार बरेच लोक वेळोवेळी त्रिकुटाचे काढ्याचे योग्य प्रमाणात सेवन करत आहे . याशिवाय लोक तुळशीचा रस, गिलोय धनवटी,आले, काळी मिरी, लवंग आणि मध यांचे सेवन करतात. असे मानले जाते की तुळसमध्ये योग्य प्रमाणात आलं, काळी मिरी, आले आणि मध मिसळून प्यायल्याने प्रतिकारशक्ती वाढते. यासाठी आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घ्या.
 
4 मालिशः बरेच लोक घर्षण, दंडन, थपकी, कंपनआणि संधी प्रसारण  पद्धतीने शरीरावर मालिश करीत आहेत. यामुळे मांसाचे स्नायू मजबूत होतात. रक्त परिसंचरण सहजतेने होते. तसेच तणाव, नैराश्यातून मुक्त करते. शरीर तेजस्वी होते. जर शरीरात रक्ताभिसरण व्यवस्थित  असेल तर कोणताही रोग किंवा आजार होणार नाही.
 
5 ध्यान: आजकाल ध्यान करण्याचा ट्रेंडही वाढत आहे. रोगास शारीरिक आजार म्हणतात आणि शोक म्हणजे सर्व प्रकारचे मानसिक दुःख . दोन्हीची उत्पत्ती मन, मेंदू आणि शरीराच्या कोणत्याही भागामध्ये होते.. ध्यान केल्याने तो भाग निरोगी होतो. ध्यान मन आणि मेंदूला भरपूर ऊर्जा आणि सकारात्मकतेने भरतो . शरीर देखील स्थित होऊन रोगाशी लढण्याची क्षमता मिळवतो . चिंता आणि चिंतन केल्यास रोगांचे नायनाट  होतील.
 
6 शुद्ध हवा आणि पाण्याचे सेवनः सकाळी उठून मॉर्निक वॉकला जा. बरेच लोक सकाळी 1 तास पायी चालतात . चालणे हे आरोग्यासाठी सर्वात फायदेशीर आहे. शंभर औषधे एक फिरणे . डॉक्टर म्हणतात की जे नियमितपणे चालून आपली सहनशक्ती वाढवत आहेत त्यांच्यावर साथीच्या रोगाचा फारसा किंवा गंभीर परिणाम होत नाही. आपण आपल्या घरात किंवा गच्चीवर कमीतकमी अर्धा तास देखील चालू शकता. या मुळे   चांगली झोप लागते  आणि आरामशीर आयुष्य जगल्याने प्रतिकारशक्ती वाढते. निद्रानाश, भीती, किंवा तणावामुळे प्रतिकारक शक्ती कमी होऊ लागते.
 
7 हळदीचे दूध -बरेच लोक रात्री दुधात हळदी घालून पीत आहे. 
तर काही लोक कोमट पाण्यात  लिंबाचे रस  आणि हळद घालून पीत आहेत. हळद हे अँटी सेप्टिक आणि अँटी बायोटिक  गुणधर्मांकरिता ओळखली  जाते आणि दूध आणि कॅल्शियमचा स्त्रोत असण्यासह  शरीर आणि मेंदू साठी अमृतसारखेच आहे.
 
या व्यतिरिक्त लोक अधून मधून मिठाच्या पाण्याचे गुळणे करीत आहे. तसेच उपवास आणि व्यायाम देखील करत आहे. आवश्यक असल्यावरच समजूतदार लोक घराबाहेर पडत आहे .