शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 डिसेंबर 2021 (10:08 IST)

या चार गोष्टींचा विचार करुन लोक नेहमी दुःखी राहतात

एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात कधी आनंदी असते की समाधानी नसते हे सांगणे कठीण असते. बर्‍याचदा आपण हसणे, आनंद किंवा स्मित सारखेच घेतो तर हसणे म्हणजे नेहमी आनंदी असणे असे नाही. अनेकदा हसणारे लोक नैराश्य किंवा मानसिक आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांशी झुंजताना दिसतात. तसेच जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला एकटे, तणावग्रस्त किंवा भांडण करताना पाहतो तेव्हा आपण असे गृहीत धरतो की तो आनंदी नाही, परंतु तसे असू शकत नाही. काहीवेळा जे लोक स्वत: दुःख किंवा तणावाचा सामना करत आहेत त्यांना हे माहित नसते की ते इतके कटुता आणि दुःखातून का जात आहेत. अशा स्थितीत अशी अनेक चिन्हे आहेत, ज्यावरून माणूस आतून दुःखी आहे याचा अंदाज लावता येतो.
 
जुन्या गोष्टींचा विचार करणे
आपला भूतकाळ हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे, परंतु आपण वर्तमान किंवा आज विसरू शकत नाही आणि प्रत्येक क्षणी भूतकाळातील क्षणांचा विचार करू शकत नाही. जर तुम्ही अनेकदा भूतकाळाचा विचार करत असाल आणि त्यात जगू लागलात तर तुम्ही कुठेतरी वर्तमानात आनंदी नाही. तुम्ही जे गमावले आहे किंवा आधीच घडलेल्या गोष्टी तुम्ही बदलू शकत नाही. अशा परिस्थितीत भूतकाळाचा वारंवार विचार करून तुम्ही आनंदी होऊ शकत नाही.
 
असंतोष
कधी कधी आपण जीवनातील असंतोषी असल्याचे जाणवतं. आमची इच्छा असते की आमच्याकडे असं असतं की किती बरं झालं असतं, किंवा तसं व्हायलं हवं होतं...त्यावेळेस आपण आयुष्याचा वेगळा निर्णय घेतला असता, पण नेहमी असा विचार करून आपण कुठेतरी तणावाचा बळी होतो. या गोष्टी देखील दर्शवतात की तुम्ही दुःखी आहात.
 
लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात याचा विचार करता
लोकांना गॉसिपिंगची सवय असते. कधी-कधी तुम्ही कितीही चांगलं वागलात, पण लोक तुमच्याबद्दल बोलत राहतात, अशा परिस्थितीत तुम्ही या गोष्टींचा ताण न घेता पुढे जायला हवं. दुसरीकडे, जेव्हा तुम्ही आनंदी असता तेव्हा तुम्ही अशा गोष्टींबद्दल कमी विचार करता, परंतु जर तुम्ही स्वतःबद्दलच्या गप्पांची काळजी करत राहता, तर याचा अर्थ तुम्ही दुःखी आहात.
 
जीवनात सर्वकाही नियंत्रित करण्याचा प्रयत्न
तुमच्या भूतकाळाप्रमाणे, तुमच्या नियंत्रणात नसलेल्या गोष्टींबद्दल तुम्ही जास्त काही करू शकत नाही, तर तुम्ही तुमचे मार्ग बदलू शकता. प्रत्येक गोष्ट स्वतःच्या वेळेवर चालवता येत नसल्यामुळे तुम्ही दु:खी असाल, तर तुम्ही बर्‍याच अंशी दु:खी आहात. आयुष्यात काय घडणार आहे, गोष्टी कशा घडणार आहेत याचा विचार केल्याने तुम्ही अधिक तणावग्रस्त आणि दुःखी व्हाल. तुम्ही तुमचा आजचा दिवस जगण्यात अयशस्वी व्हाल आणि तुमच्या जीवनात खरोखर आनंद आणू शकतील अशा सुंदर गोष्टींना मुकावे लागेल.