1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By

पुरेशी झोपही कमी करते शरीराचा लठ्ठपणा

सियोल- तंदुरूस्त आरोग्यासाठी पुरेशी झोप अत्यंत महत्त्वाची असते. जर पुरेशी झोप घेतली नाही तर अनेक शारीरिक आणि मानसिक समस्या उद्धवतात. तसेच अपुर्‍या झोपेचा प्रतिकूल परिणाम शरीरातील हार्मोन्स आणि मेटाबॉलिज्म यांच्यावर पडतो. यामुळे लठ्ठपणाचा धोका वाढत जातो. शरीराला तंदुरूस्त आरि ताजेतवाने ठेवण्यासाठी झोप अत्यंत उपयुक्त आहे. मात्र कमी झोप घेतल्याने लठ्ठपणा, हायपरटेंशन, कोरोनरी हार्ट डीसिज असे विकार होण्याची शक्यताही वाढत जाते. या आजरांमुळे जगात मृत्यू पावणार्‍यांचे प्रमाणही जास्त आहे. असे मत सियोल नॅशनल युनिव्हर्सिटी च्या बुडांग हॉस्पिटलचे डॉ. चेंग हो यून यांनी व्यक्त केले आहे. 
 
एखादी डुलकी घेण्यापेक्षा गाढ झोप ही शरीरासाठी चांगली असते. यामुळे स्लिप आणि वेक या दोन शारीरिक प्रक्रियांचा सुरळीत मेळ बसतो. आठवड्याच्या अखेरीस घेण्यात येणार्‍या झोपेचा आणि वजन यांच्या परस्पर कसा आणि किती संबंध आहे, यासंबंधी संशोधन करण्यासाठी संशोधनकांनी 19 ते 82 वर्षे वयोगटातील 2 हजारांहून अधिक लोकांवर अभ्यास केला.