रविवार, 12 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By

अतिझोपण्याच्या सवयीमुळे तुमचे हे नुकसान होऊ शकते!

पुरेशी झोप ही शरीराला पाहिजेच. झोप जर अपुरी झाली तर त्याने आरोग्य बिघडू शकते. त्यामुळे रात्री नियमित प्रत्येकाने 8 तासांची झोप घेणे गरजेचे असते. मात्र अतिझोपेने देखील शरीराचे नुकसान होऊ शकते. चला तर मग जाणून घेऊयात अतिझोपेमुळे काय नुकसान होते तर... काही शास्त्रज्ञांच्या ते मात्र याचा उलट परिणाम होतो. दिवसा झोपल्याने मेंदूवर उलट परिणाम होतो. यामुळे अनुभवांशी निगडित आठवणी आपण विसरतो. आपल्या वास्तविक जीवनात नसलेल्याही काही गोष्टी आपल्या डोक्यात शिरकाव करतात. यामुळे आपल्या मनात भीती निर्माण होते. केवळ दिवसा नव्हे तर रात्रीची झोपही अतिप्रमाणात घेतल्यास त्याचा मेंदूवर परिणाम होतो. मेंदूमध्ये आठवणींचा कप्पा बदलत असला तरीही त्यासोबत भीतीदेखील वाढण्याची शक्यता असते. मेंदूच्या डाव्या भागापेक्षा उजव्या भागात आठवणी अधिक प्रमाणात राहतात. दिवसा झोपल्याने मेंदूचा उजवा भाग अधिक प्रभावित होतो. त्यामुळेच या भागात असलेल्या आठवणींवरही परिणाम होतो.