शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: सोमवार, 23 नोव्हेंबर 2020 (11:30 IST)

अनोखा मास्क

कोरोनाच्या काळात पुनर्वापरायोग्य मास्कची उपयु्रतता लक्षात घेऊन वैज्ञानकांनी एक अनोखा मास्क तयार केला आहे. हा मास्क 99.99 टक्के जीवाणू आणि विषाणू यांना नष्ट करू शकतो. या मास्कचे वैशिष्ट्य म्हणजे एक तास सूर्यप्रकाशात राहिल्यासच तो निर्जंतूक बनतो. हा मास्क सुती कापडापासून तयार केलेला असून तो साफ करून पुन्हा वापरता येऊ शकतो. मास्क तयार करण्यासाठी विविध प्रकारच्या कपड्यांचा वापर केला गेला असून तो शिंकल्यावर आणि खोकल्यावर तोंडातून उडणारे तुषार शोषून घेईल. 
 
एसीएस अप्लाईड मटेरियल अँड इंटरफेसेस नावाच्या पत्रिकेमध्ये याविषयीचा एक अभ्यास प्रकाशित झाला आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया विापीठातील संशोधकांनी एक नवे सुती कापड विकसित केले आहे जे सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यानंतर रिअॅंक्टीव्ह ऑक्सिजन स्पाईक्सचे उत्सर्जन करते. त्यामुळेसूक्ष्मजीव मरतात आणि तो मास्क धुण्यायोग्य आणि पुन्हा वापरता येण्याजोगा होता.
 
हा मास्क तयार करण्यासाठी बंगाल डायपासून नवलेले कापड वापरण्यात आले असून हा डाय फोटोसेन्सिटाझरच्या रूपात काम करेल. हे कापड एका तासात 99.99 टक्के  जिवाणू नष्ट करू शकते. हा मास्क तीस मिनिटे सूर्यप्रकाश आणि टी-7 बॅक्टेरियाफेजच्या संपर्कात आल्यास 99. 99 टक्के जिवाणूंचा नाश होतो. त्यामुळे मास्कचा पुनर्वापर करता येऊ शकतो आणि तो सुरक्षितही राहातो.
विजयालक्ष्मी साळवी