शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By

मासे आवडतात? पण जरा सांभाळून....

मासे खाणार्‍यांची संख्या कमी नाही. माशांपासून तयार केलेले वेगवेगळे पदार्थ खाण्यासाठी खव्व्ये नेहमी तत्पर असतात. माशांमधून अनेक पोषकद्रव्यं, खनिजं, प्रथिनं मिळतात. हृदयासाठी मासे उपयुक्त ठरतात. परंतु वाढत्या जलप्रदूषणामुळे मासे खाणे घातक ठरू शकतं.
 
प्रदूषणामुळे माशांच्या शरीरात पार्‍याचा अंश आढळतो. हा अत्यंत विषारी धातू आहे. याबाबत संशोधन केल्यानंतर शास्त्रज्ञांनी हा निष्कर्ष काढला आहे:
 
शरीरात पार्‍याचं प्रमाण वाढल्यास माणसाच्या रोगप्रतिकारक क्षमतेवर विपरित परिणाम होतो.
 
* याने निरोगी पेशींवर हल्ला होता आणि पेशी नष्ट होतात.
 
प्रजननक्षम महिलांना यामुळे अधिक त्रास होण्याची शक्यता असते.