शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: रविवार, 21 नोव्हेंबर 2021 (15:01 IST)

विरुध्द आहार टाळा, जीभेवर जितका ताबा ठेवाल तितकं निरोगी राहाल

आयुर्वेदानुसार अनेक आजारांचे कारण  हे "विरुध्द आहार" सांगितले आहे.असा आहार जो नीट पचत नाही आणि तसाच शरीरात साठून राहतो आणि जेव्हा संधी मिळेल तेव्हा शरीरातील इतर घटकांच्यामध्ये मिक्स होऊन व्याधी निर्माण करतो तो विरुध्द आहार आहे. आपल्या रोजच्या आहारातील काही गोष्ठी ज्या चुकीच्या आहेत..
 
१) दूध आणि कोणतेही फळं एकत्र करून खाणे.जसे की मिल्क शेक,केळीची शिक्रण, फ्रूट क्रीम, फ्रूट कस्टर्ड हे कधीही खाऊ नये.
 
२) दही दूध भात एकत्र करून खाणे चुकीचे आहे. एकतर दूध भात खा किंवा दही भात. कोणतीही आंबट गोष्ट दुधात एकत्र करू नये.
 
३) दूध लोणचे भात
 
४) कडु पदार्थात दूध घालू नये. काही भाज्या जसे की मेथी मटर मलाई यात क्रीम आणि दूध असते. तसा एकत्र संयोग चुकीचा आहे.
 
५) ग्रेव्हीच्या भाज्या ज्यात टोमॅटो आणि क्रीम एकत्र केलेले असते .
 
६) गरम पाणी आणि मध
 
७) दूध आणि मासे एकत्र करून खाऊ नयेत.
 
८) कॉर्नफ्लॅक्स आणि दूध 
 
विशेषत त्वचा विकार, ज्यांचा कोठा खूप जड आहे, रोजच्या रोज पोट साफ होत नाही, अंगावर पित्त उठणे , आमवात अशा पेशंट नी विरुद्ध आहार करू नये अन्यथा किती ही औषधे घेतली तरी त्रास कमी होत नाही.
रोजच्या प्रॅक्टिस मध्ये अशा चुकीच्या खाण्या पिण्याच्या सवयी मुळे झालेले नुकसान आम्ही  नेहमी अनुभवत असतो. कधीतरी एखाद्यावेळी खाणे गोष्ट वेगळी पण सतत असा विरुध्द आहार घेणे शरीराला नक्कीच हानिकारक आहे.
नुसतं औषधांच्या मागे न लागता खाण्यापिण्यात काय चुकीचे आहे हे समजून घ्या म्हणजे आजारापासून लवकर सुटका होईल. जीभेवर जितका ताबा ठेवाल तितकं निरोगी राहाल. नाहीतर औषधे,तपासण्या आणि डॉक्टर यांच्या दुष्ट चक्रात अडकून पडाल.