गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

आरोग्य आणि सौंदर्य देणारे तमालपत्र

तमालपत्रांचा वापर केवळ अन्नापुरतीच मर्यादित नव्हे तर आपणास हे जाणून आश्चर्य होणार की तमालपत्र वापरल्याने आपल्या त्वचेला आणि केसांनाही फायदा होतो. चला, जाणून घ्या आपण आपले सौंदर्य वाढविण्यासाठी आणि निरोगी होण्यासाठी तमालपत्र कसे वापरू शकता.
 
तमाल पत्राचे चला 10 अमूल्य गुण जाणून घेऊया
 
1 चेहऱ्यावर  डाग, किंवा मुरुम असल्यास तमालपत्राची पाने  खूप फायदेशीर असतात. तमालपत्रांची पेस्ट किंवा तमालपत्र घालून उकळलेल्या पाण्याने चेहरा धुवावा.हे चेहऱ्यालाला  स्वच्छ करतो आणि चेहरा डाग रहित ठेवतो. 
 
2 तमालपात्राच्या पानाचे  पाणी सूर्याच्या किरणांमुळे प्रभावित झालेल्या त्वचेला बरे करण्यास आणि त्वचेचा रंग राखण्यास मदत करतं.
 
3 केसांना मऊ आणि चमकदार ठेवण्यासाठी तमालपत्राचा वापर प्रभावी आहे.आपण हे तेलात मिसळून तेलाला केसांच्या मुळात देखील लावू शकतो,किंवा याच्या पाण्याने केस देखील धुवू शकतो.
 
4 तमालपत्रांची पेस्ट केसांवर लावल्याने डोक्यातील कोंडापासून मुक्तता मिळते . ही पेस्ट दह्यामध्ये  मिसळून देखील लावली जाऊ शकते, जेणेकरून टाळूत ओलावा राहील आणि टाळूला पोषण मिळेल.
 
5 तमालपत्राची पाने वाळवून त्याची भुकटी बनवावी ही भुकटी दातावर मंजन म्हणून चोळल्याने दातांची चमक तशीच राहते आणि दात पांढरे होतात.आपण हे मंजन आठवड्यातून एक दिवस देखील करू शकता.
 
6 एखाद्या ला कंबरदुखी चा त्रास असल्यास याचा काढा करून प्यावा. कंबरदुखी पासून त्वरितच आराम मिळतो.आपण याचा तेलाची मॉलिश देखील कंबरेवर करू शकता.
 
7 हिवाळ्यात थंड वाऱ्यामुळे देखील होणारी शारीरिक वेदनेला हा काढा दूर करतो.या साठी आपण 10 ग्रॅम तमालपत्र,10 ग्रॅम ओवा,आणि 5 ग्रॅम शोप एकत्र वाटून घ्या.हे मिश्रण 1 लिटर पाणी घालून चांगल्या प्रकारे उकळवून घ्या.पाणी उकळल्यावर 100 -150 मिलिलिटर पाणी शिल्लक राहिल्यावर गॅस बंद करून द्या.हे पाणी थंड झाल्यावर हा काढा पिण्यासाठी तयार आहे.
 
8 शरीरात कुठेही मुचक आली असल्यास सूज आणि वेदना कमी करण्यासाठी तमालपत्राचा काढा प्रभावी आहे.तमाल पात्र वाटून त्याची पेस्ट बनवून वेदनेच्या जागी लावल्याने आराम मिळेल.
 
9 स्नायूंमध्ये ताण असल्यास तर या साठी देखील तमालपत्राचा काढा घेऊ शकता. हे आराम देईल.
 
10 तमाल पत्रात कॉपर,पोटॅशियम,केल्शियम,मॅग्नेशियम,सेलेनियम,आणि आयरन मुबलक प्रमाणात आढळतं.या मध्ये बरच अँटीऑक्सीडेंट असतात,जे कर्करोग,रक्ताच्या गुठळ्या होणे आणि हृदयाच्या अनेक गंभीर आजारापासून संरक्षण करतात.