बुधवार, 8 फेब्रुवारी 2023
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Updated: रविवार, 4 डिसेंबर 2022 (08:11 IST)

Burn Belly Fat पोटाची चरबी गाळण्यासाठी केवळ 10 मिनिटांचा व्यायाम पुरेसा

belly fat
पोटाच्या चरबीमुळे लोक खूप चिंतेत असतात. कारण चरबी वितळणे फार कठीण आहे. त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. अशात आम्ही आपल्याला अशाच काही पोटाच्या व्यायामाबद्दल सांगणार आहोत ज्या आपण केवळ दहा मिनिटेही केलेत तर हळूहळू तुमचे लटकणारे पोट कमी होईल. काही लोक वजन कमी करण्यासाठी केवळ आहारावर अवलंबून असतात परंतु त्यासोबत शारीरिक हालचालीही खूप महत्त्वाच्या असतात.
 
पोटाची चरबी कमी करण्याचा व्यायाम
पोटाची चरबी कमी करायची असेल तर रोज चक्की चलनासन करावे. याने कंबर आणि पोटावर दाब निर्माण होतो ज्यामुळे चरबी हळूहळू वितळू लागते. आपण हे 10 मिनिटांसाठी देखील केले तर काही दिवसात परिणाम दिसून येतील.
 
कटी चक्रासन केल्याने पोट आणि कंबरेची चरबी कमी होते. जर तुम्ही दररोज 10 मिनिटे हे केले तर स्लिम कंबर हे स्वप्न पूर्ण होईल.
 
याशिवाय रोज सकाळी 10 मिनिटे फिरायला जावे. यामुळे चरबी वितळण्यासही मदत होईल. शिवाय चरबी कमी करण्यासाठी धावणे हा देखील उत्तम पर्याय आहे.
 
आपण चरबी वितळण्यासाठी पोहण्याचा पर्याय देखील निवडू शकता. यात संपूर्ण शरीर अॅक्टिव्ह राहतं. ज्यामुळे चरबी वितळणे सोपे होते. याने फुफ्फुस आणि हृदय मजबूत होतं. हे वयाचा प्रभाव चेहऱ्यावर दिसण्यापासून देखील रोखते.
 
नियमित एरोबिक वजन संतुलित करून शरीर लवचिक आणि मजबूत बनवतं. वजन कमी करण्यासाठी हा पर्याय देखील निवडू शकता.