शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: गुरूवार, 19 नोव्हेंबर 2020 (10:15 IST)

दुधासह अक्रोडचे सेवन केल्याचे आश्चर्य कारक फायदे

खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे किंवा त्याशी निगडित अडचणींमुळे अनेक आजार आपल्या शरीरात प्रवेश करतात. या मध्ये गंभीर आजार देखील असतात. त्या आजारांशी लढा देण्यासाठी आपल्या शरीरास पोषक घटकांची गरज असते. हे पोषक घटक आपल्याला फळे, ताज्या भाज्या आणि सुकेमेवे या पासून मिळतात. तसे सुकेमेवे आपल्या शरीरासाठी तसेच आरोग्यासाठी फायदेशीर असतात. त्यात अनेक प्रकाराचे पोषक घटक असे ही असतात जे आपल्या शरीरास फायदे देतात. या मधील अक्रोडचे फायदे आपणास सांगत आहोत. 

याचे सेवन आपण दुधात उकळवून केल्यानं हे शरीराला फायदेशीर असतं. चला तर मग जाणून घेऊ या की याचा सेवन केल्यानं कोणत्या आजाराचा धोका टाळता येतो.
 
* कर्क रोगाचा धोका कमी होतो - 
असे मानले जाते की अक्रोडमध्ये कर्करोगाला लढा देण्याचे गुणधर्म आढळतात. याने कर्करोगाचा धोका कमी करता येतो. याचे सेवन दुधात उकळवून केल्यानं हे शरीरामधील वाढणाऱ्या कर्करोगाच्या पेशी नष्ट करतात, ज्यामुळे आपण या आजारापासून मुक्त होऊ शकता.
 
* हृदयरोगाचा धोका कमी करतो -
भारतातील कोट्यावधी लोक हृदयरोगाच्या आजाराने ग्रस्त आहेत. या मध्ये तरुणांचा देखील समावेश आहे. अशा परिस्थितीत अक्रोडाचे सेवन त्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतं. वास्तविक, अक्रोडमध्ये हृदय कार्डियो प्रोटेक्टिव एक्टिविटी असते, जे प्रामुख्याने हृदय रोगाचा धोका कमी करण्यास उपयुक्त आहे.
 
* वाढत्या वयाचा परिणाम कमी करतो - 
अक्रोडमध्ये अँटी एजिंग गुणधर्म आढळतात. जे वाढत्या वयाच्या प्रभावाला कमी करू शकतात. हे गुणधर्म दुधात देखील आढळतात. अशा परिस्थितीत या दोन्ही पदार्थांचे एकत्र सेवन केल्यानं वाढत्या वयाचा परिणाम कमी होतो आणि त्वचा देखील टाईट राहते.
 
* मेंदूला तीक्ष्ण बनवतं - 
दूध आणि अक्रोडचे सेवन एकत्र केल्यानं मेंदूसाठी फायदेशीर ठरतं. या मध्ये पौष्टिक घटक मेंदूला चालना देण्यासाठी मदत करतात. तसेच हे मेमरी पॉवर म्हणजेच स्मरण शक्ती वाढविण्यास उपयुक्त ठरतात.
 
* मधुमेहाचा धोका कमी करतो - 
एका संशोधनानुसार, दूध आणि अक्रोडचे एकत्र सेवन केल्यानं रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत होते. या मुळे मधुमेहाचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होतो. मधुमेहाने ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी हे खूप फायदेशीर आहे.