रविवार, 26 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: सोमवार, 1 एप्रिल 2019 (16:39 IST)

लिंबाचे औषधी फायदे माहित आहे का?

अजीर्णावर लिंबू फार उपयुक्त आहे. ते आडवे कापून त्यावर सुंठ किंवा सैंधव (मीठ) घालून निखाऱ्यावर गरम करावे आणि वारंवार चोखावे. त्यामुळे करपट ढेकर, ओकारी, पोटफुगी वगैरे त्रास कमी होतो. 
 
लिंबाचे अनेक औषधी उपयोग आहेत. लिंबु उभे कापून त्यावर खडीसाखर घालून चोखल्यास ओकारी थांबते. 
 
पोटदुखी थांबण्यास आले व लिंबाचा रस साखर घालून सेवन करावा. 
 
पित्त झाले असल्यास रोज लिंबाचे सरबत घ्यावे. त्याने भूक वाढते. अन्न पचते व शौचास साफ होते. मेदवृद्धि म्हणजे लठ्ठपणा कमी करण्यासाठीही रोज लिंबाचा रस उन पाण्यात घालुन घेतल्याने उपयोत होतो. 
 
वाळलेले लिंबू मधात घालून चाटण म्हणून घेतल्यास उचकी तसेच ओकारी थांबण्यास मदत होते. 
 
अंगाला कंड सुटत असल्यास लिंबाचा रस खोबरेल तेलात मिसळून अंगास चोळावा व ऊन पाण्याने स्नान करावे. कंड कमी होतो.