रविवार, 5 ऑक्टोबर 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By
Last Updated : सोमवार, 18 मार्च 2019 (08:54 IST)

सकाळी रिकाम्या पोटी स्प्राउटेड चणे खा आणि रोग टाळा

benefits
सकाळी-सकाळी रिकाम्या पोटी स्प्राउटेड चणे खाणे खूप फायदेशीर आहे, यामुळे शरीर स्वस्थ राहतो आणि रोग जवळपास देखील येत नाही. स्प्राउटेड चणे संपूर्ण किंवा वाटून साखर आणि पाण्या सोबत खाल्ल्याने शरीरातील प्रोटिनाचे प्रमाण कायम राहत. तसेच, स्नायू देखील मजबूत होतात. कोणत्याही स्वरूपात स्प्राउटेड चणे वापरणे फायदेशीर आहे. हे सलाड म्हणून देखील वापरले जातात. यामध्ये प्रोटीन, विटामिन आणि फायबरचे असलेले प्रमाण तणाव दूर करण्यास मदत करते.  
 
* स्प्राउटेड चणे वापरण्याचे 8 फायदे : -
 
- चण्यामध्ये फायबरची मात्रा जास्त राहते. भिजवून खाल्ल्याने पोट किंवा कब्जा संबंधी समस्या टाळता येते.
- मूत्र समस्या असल्यास, किंवा पुन्हा-पुन्हा मूत्र येत असेल तर चणा अत्यंत फायदेशीर आहे.
- रिकाम्या पोटी चणे खाण्याने शरीरात अतिरिक्त प्रमाणात ग्लूकोज बनत नाही. मधुमेह देखील नियंत्रणात राहत.  
- मानसिक तणाव असलेल्या लोकांसाठी चणा खूप फायदेशीर आहे.
- सकाळी वाटलेल्या चण्यासोबत साखर किंवा पाणी मिसळून प्यायल्याने मानसिक तणाव दूर होतो. 
- कावीळ असलेल्या रुग्णांनी नियमितपणे चणे खावे. हे बरेच फायदेशीर असतात.
- स्प्राउटेड चणे हिरव्या मुगासोबत खाल्ल्याने खाण्याने प्रोटिनाची मात्रा वाढते.  
- याच्या नियमित सेवनाने थकवा दूर होण्यास मदत मिळते.