गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: गुरूवार, 14 मार्च 2019 (00:50 IST)

झोपेसाठी औषध घेऊ नका, हे 5 काम केल्याने बिंदास आणि गाढ झोप लागेल

झोपेसाठी 5 औषधरहित उपचार
 
1. नियमित व्यायामाची सवय टाका, याने चांगली झोप लागते, पण झोपण्याअगोदर व्यायाम करू नये.
 
2 . झोपेच्या खोलीला शांत व अंधकारमय ठेवा. उठण्याची व झोपण्याची नियमित दिनचर्या बनवा. झोपेसाठी शवासन लाभदायक आहे.
 
3. झोपताना सकारात्मक विचार मस्तिष्काला शांती देते.
 
4. व्यावहारिक उपचार- काही खास व्यावहारिक उपायांमुळे देखील अनिद्रेची समस्येचा उपचार होऊ शकतो जसे - जर झोप नसेल येत तर बिस्तरावर जाऊ नये. झोपण्याच्या खोलीचा वापर फक्त झोपेसाठी करावा. बिस्तरावर पडल्या पडल्या झोपेची वाट पाहू नये. जेव्हा झोप येत असेल तेव्हाच बिस्तरावर पडावे.
 
5. दर रोज सकाळी एका निश्चित वेळेवर उठा. रात्री निश्चित वेळेवर झोपा. लेट नाइट पार्टी व टीव्हीचा लोभ सोडा. दिवसा झोपू नये, ज्याने रात्री झोप लागण्यास मदत मिळेल.