बुधवार, 30 एप्रिल 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: मंगळवार, 29 एप्रिल 2025 (22:30 IST)

रात्री झोपण्यापूर्वी ओव्याचे पाणी प्या, या आजारांपासून आराम मिळेल

ova
सध्या धकाधकीच्या जीवनात आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे, बदलत्या जीवनशैलीमुळे आणि खाण्यापिण्याच्या सवयीमुळे कमी वयातच मधुमेह, रक्तदाब, हृदयाचे आजार वाढत आहे. कामाचा स्वरूप बदलले आहे. ताणतणावमुळे अनेकदा आजाराला बळी पडतो. अशा परिस्थितीत ओव्याचे पाण्याचे सेवन करणे आरोग्याला फायदेशीर आहे. त्याचे फायदे आणि सेवन कसे करायचे जाणून घेऊ या.
पचनसंस्था मजबूत करते
चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयीमुळे गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठता यासारख्या पचनाच्या समस्या खूप सामान्य आहेत. ओव्या मध्ये पचन सुधारणारे घटक असतात. हे अन्न लवकर पचण्यास मदत करते आणि गॅस तयार होण्यास प्रतिबंध करते. ओव्याचे पाणी पिल्याने तुमच्या पोटातील उष्णता कमी होते आणि पचनसंस्था निरोगी राहते. विशेषतः जर तुम्ही रात्री जड अन्न खाल्ले तर झोपण्यापूर्वी ओव्याचे पाणी प्यायल्याने फायदे मिळतील. 
 रक्तातील साखर नियंत्रित करते
मधुमेह हा एक गंभीर आजार आहे जो हळूहळू शरीराच्या अनेक भागांवर परिणाम करतो. संशोधनानुसार, ओव्याचे पाणी  रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करते. याच्या सेवनाने इन्सुलिनची पातळी संतुलित होते आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित होते. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी ओव्याचे पाणी पिणे मधुमेही रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकते.
 
त्वचेसाठी फायदेशीर 
ओव्यात अँटीऑक्सिडंट्स देखील आढळतात जे सुरकुत्या, डाग आणि कोरडेपणा यासारख्या त्वचेच्या समस्या दूर करण्यास मदत करतात. ओव्याचे पाणी नियमितपणे प्यायल्याने त्वचा आतून हायड्रेटेड आणि चमकदार राहते. हे शरीरातील हानिकारक विषारी पदार्थ काढून टाकण्यास देखील मदत करते, ज्यामुळे तुमची त्वचा निरोगी दिसते.
ओव्याचे पाणी कसे बनवाल 
ओव्याचे पाणी बनवण्यासाठी एक चमचा ओवा घ्या आणि रात्रभर कोमट पाण्यात भिजवून ठेवा सकाळी गाळून ते पाणी रिकाम्यापोटी प्या रात्री झोपण्यापूर्वी प्यायचे असल्यास झोपण्यापूर्वी 30 मिनिटे आधी पिऊ शकता. ओव्याच्या पाण्याचे नियमित सेवन केल्याने आरोग्यदायी फायदे मिळतात. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 Edited By - Priya Dixit