सोमवार, 28 एप्रिल 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: सोमवार, 28 एप्रिल 2025 (07:00 IST)

या गोष्टी आरोग्यासाठी हानिकारक आहे, या करणे टाळावे

सध्या धकाधकीच्या आयुष्यात निरोगी आयुष्य जगणे हे आवश्यक आहे. बदलत्या जीवनशैली आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या  सवयीमुळे कमी वयातच रक्तदाब, मधुमेह, थायराईड, सारखे आजार उदभवत आहे. या शिवाय काही चुकीच्या सवयींमुळे  देखील आरोग्यास हानी होते. या गोष्टी कोणत्या आहे ते जाणून घेऊ या. 
1. बेड टी आरोग्यासाठी हानिकारक 
 
बेड टी घेण्याने शरीरात आम्लता आणि गॅसची तक्रार होऊ शकते. म्हणूनच बेड टी ऐवजी कोमट पाण्यात मध किंवा ‍लिंबाचा रस घालून प्यावे. याने पचन क्रिया चांगली होते, प्रतिरोधक क्षमता वाढते आणि रक्त प्रवाह सुरळीत होतो. याच्या एका तासानंतर चहा घेऊ शकता. ही सवय लागल्याशिवाय दुसरी सवय बदलण्याचा प्रयत्न करू नये.
 
2. जंक फूडला टाळा
संध्याकाळी नमकीन, पिझ्झा, बर्गर किंवा तळकट पदार्थ खाणे वाईट सवय आहे. याने शरीराला कोणत्याही प्रकारचे पोषण मिळत नसून हे फक्त पोट भरण्यासाठी आहे. याने वजन तर वाढतच आणि जेवण्याची इच्छाही कमी होत जाते.संध्याकाळी भूक लागल्यावर फळं खावी.
3. भरपूर पाणी प्या
कमी पाणी पिण्याने बद्धकोष्ठता, अपचन आणि पोटातील इतर विकार होऊ शकतात.भरपूर पाणी प्यायल्याने त्वचा देखील चांगली होते. 
दिवसातून कमीत कमी तीन ते चार लीटर पाणी प्यावे.
 
4. फायबर आवश्यक आहे
जेवणात फायबर पदार्थ न घेणे आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक आहे.म्हणूनच ब्रेड, बिस्किट याऐवजी पोळी, ओट्स, आणि फळांचा ज्यूस भरपूर मात्रेत सेवन करायला हवा.
Edited By - Priya Dixit