शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By वेबदुनिया|

पिया करो मगर... थोडी...थोडी

'पिने वालों को पिने का बहाना चाहीये' म्‍हणत पेगवर पेग जर तुम्‍ही रिचवत असाल.... तर सावधान. अमेरिकेतल्‍या शास्‍त्रज्ञांनी केलेल्‍या एका संशोधनानुसार प्रमाणापेक्षा जास्‍त मद्य प्‍यायल्‍यास मेंदू आकुंचित होऊन त्‍याचा स्‍मरणशक्‍तीवर मोठा परिणाम होत असतो. 

मेसाच्युसेट्स येथील वेलेस्‍ले कॉलेजमधील संशोधक केरोल ऑन पेन यांच्‍या मार्गदर्शनाखाली केल्या गेलेल्‍या एका संशोधनानुसार अत्‍यल्‍प प्रमाणात मद्यपान केल्‍यास त्‍याचा शरिरासाठी उपयोग होतो. मात्र प्रमाणाबाहेर सातत्‍याने प्‍यायल्‍यास मेंदू आकुंचन पाऊन लहान होऊ शकतो.

महिलांसाठी तर मद्यपान अतिशय धोकादायक असते. कारण त्‍यांच्‍यावर लवकर हा परिणाम होत असतो. महिलांचा मेंदू पुरुषांपेक्षा लहान असल्‍याने हा प्रकार होत असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.