सोमवार, 6 फेब्रुवारी 2023
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified मंगळवार, 11 डिसेंबर 2018 (00:42 IST)

पाच प्रकारचे मीठ असतात, आरोग्यानुसार जाणून घ्या कोणते मीठ खाणे तुमच्या आरोग्यासाठी योग्य आहे....

कोणता मीठ आरोग्यासाठी फायदेशीर आहे आणि कोणते हानिकारक आहे ते आता स्वत: निवडा. असे म्हटले जाते की मिठाशिवाय अन्नाची चव अपूर्ण असते. मीठ सोडियमचा सर्वोत्तम स्रोत मानला जातो. हे पचन तंत्र सुधारण्यात मदत करतो. दुसरीकडे, जर आपण याचे सेवन अधिक प्रमाणात केलेतर  शरीरात सोडियमची मात्रा जास्त देखील होऊ शकते. आज आम्ही तुम्हाला पाच प्रकारच्या मिठाबद्दल सांगणार आहोत जे आपण आरोग्याप्रमाणे स्वत:साठी निवडू शकता.
 
1. साधा मीठ - या मीठात सोडियम खूप जास्त असतो. आयोडीनचा देखील यात समाविष्ट राहतो, जे पचन तंत्र मजबूत करतो. परंतु या मिठाचा जास्त प्रमाणात सेवन केल्याने बरेच नुकसान होऊ शकते. सर्व प्रथम, हे हाडांसाठी हानिकारक असेल. कब्ज आणि सूज येणे या समस्या देखील होऊ शकतात.
2. रॉक मीठ - त्याला इंग्रजीमध्ये 'रॉक सॉल्ट' म्हणतात. ह्या मिठाचे सेवन उपासात केले जाते. हे बगैर रिफाइन असत. यात कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम आढळून येत. साध्या मिठापेक्षा ह्याच्यात या तीन गोष्टी अधिक प्रमाणात राहतात. आरोग्यासाठी देखील हे अत्यंत फायदेशीर मानले जाते.
 
3. काळे मीठ - याची चव बाकीच्या मिठापेक्षा चवदार असते. बहुतेक लोक याला फळे आणि उकडलेले भाज्यांवर प्रयोगात आणतात. याच्या वापराने कब्ज, पोटदुखी, चक्कर येणे, उलट्या आणि जळजळ यासारख्या समस्या सोडवण्यास मदत मिळते. पण लक्षात घेण्यासारखे म्हणजे यात फ्लोराइड भरपूर प्रमाणात असत जे आरोग्यासाठी नुकसानदायक असू शकत.
4. कमी सोडियम असणारे मीठ - बाजारात हे पोटॅशियम मिठाच्या नावाने विकले जाते. यामध्ये देखील सोडियम आणि पोटॅशियम क्लोराइड असत. रक्तदाबाची समस्या असलेल्या लोकांनी याचा वापर केला पाहिजे. हृदयाशी संबंधित समस्या असलेले आणि मधुमेह असलेले लोक देखील हे खाऊ शकतात.
 
5. समुद्री मीठ - सी सॉल्ट अर्थात समुद्री मीठ. हे देखील आरोग्यासाठी फायदेशीर आहे. ह्याची चव साध्या मिठाप्रमाणे खारी नसते. हे मिठाचा वापर पोट फुगणे, तणाव, सूज, गॅस आणि कब्ज यांसारख्या समस्यांच्या वेळी केला जातो.