सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: गुरूवार, 6 डिसेंबर 2018 (10:33 IST)

शिळी पोळी खाण्याने मधुमेहावर नियंत्रण ठेवता येईल

ज्यांना मधुमेहाची समस्या आहे, त्यांनी सकाळी रिकाम्या पोटी थंड दूध आणि रात्रीची शिळी पोळी खावी. याने रक्तात साखर नियंत्रित राहते. रात्रीच्या वेळी कोणी जर जेवले नाही किंवा एक किंवा दोन पोळी अतिरिक्त वाचली असेल तर त्याला फेकू नये बलकी आपल्या आहारात रात्रीची उरलेली पोळी समाविष्ट केली तर ती आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. आश्चर्यकारक परंतु त्यात बरेचसे फायदे लपलेले आहेत, चला या बद्दल जाणून घेऊ या.
 
* जर आपण विचार करत असाल की रात्रीच्या पोळीमधून पोषक तत्त्व संपून जातात तर तुमचा हा गैरसमज आहे. रात्रीच्या पोळीमध्ये पोषक तत्त्वांसह ओलावा राहतो जे आपण आपल्या आहारात सहजपणे मिळवू शकता.
* उच्च रक्तदाबाची समस्या असलेल्या लोकांनी रात्रीची शिळी पोळी थंड्या दुधात 10 मिनिटे भिजवून ठेवावी. हे खाण्याने रक्तदाबाची समस्या समाप्त होते.
* ज्या लोकांना अपचन, गॅस, पोटदुखी आणि अम्लताची समस्या असते, त्यांनी रात्री झोपण्याअगोदर थंड दुधा बरोबर ती शिळी पोळी खावी. सर्व अडचणी दूर होतील.
* मधुमेह असलेल्या लोकांनी सकाळी रिकाम्या पोटी थंड दूध आणि रात्रीची शिळी पोळी खावी. यानी रक्तात साखर नियंत्रित राहते.