बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

जेवल्यानंतर गार पाणी पिणे हानिकारक

गार पाणी गळ्याला आणि पोटाला शांत करत असलं तरी काय आपल्याला हे माहीत आहे का की जेवल्यानंतर गार पाणी पिणे किती हानिकारक आहे? याचा सरळ आपल्या पचन शक्तीवर परिणाम होतो. ज्याने शरीराची रोग प्रतिकारशक्तीही कमी होते.
 
जेवल्यानंतर पाणी पिणे सामान्य प्रक्रिया असली तरी पाणी गरम प्यावं की गार हे खूप कमी लोकांना माहीत असेल. जेवल्याच्या लगेच नंतर गार पाणी पिणे पित्ताशयासाठी हानिकारक आहे. आमच्या शरीराचा सामान्य तापमान 98.6 डिग्री फॉरेनहाइट अर्थात 37 डिग्री सेल्सियस असतं. आमच्या शरीरासाठी 20-22 डिग्री सेल्सियस तापमानाचे पाणी उपयुक्त आहे याहून अधिक गार पाणी पिणे हानिकारक ठरेल. बघू याचे दुष्परिणाम:
टॉन्सिल्स
गार पाणी प्यायल्यावर ते थोड्या वेळेसाठी तोंडातच राहतं आणि सामान्य तापमानावर आल्यावरच गळ्यातून खाली उतरतं. अधिक वेळेपर्यंत गार पाणी पित राहिल्याने टॉन्सिल्सची समस्या उत्पन्न होते.
 
बद्धकोष्ठता
गार पाणी शरीरात तयार होणारे पचक रसाचे तापमानदेखील कमी करतं ज्याने जेवण पचणे जड होतं आणि गार पाण्याने आतड्यादेखील संकुचित होऊन जातात ज्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्याला सामोरं जावं लागतं. ज्यांना ही समस्या असेल त्यांनी गार पाणी पिणे टाळावे.

हार्ट अटॅक
जेवल्यानंतर लगेच गार पाणी पिण्याची सवय हृदयासाठी धोकादायक ठरू शकते. एका संशोधनाप्रमाणे जेवल्यानंतर गार पाणी पिण्याने हार्ट अटॅकचा धोका वाढतो.
 
फॅट्स
जेवल्यानंतर गार पाणी पिण्याने पचन क्रियेवर प्रभाव पडतो ज्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या होते. याने पोटात आढळणारे अॅसिड खाण्याच्या संपर्कात येऊन फॅट्समध्ये परिवर्तित होतात.
 
कफ
गार पाण्याने कफ तयार होतो ज्याने रोग प्रतिकारशक्ती कमी होते ज्यामुळे सर्दी होण्याचा धोका वाढतो. म्हणून जेवल्यानंतर सामान्य किंवा गरम पाणी प्यायला हवं.