चंपाषष्ठी विशेष रेसिपी : खंडेरायाचा नैवेद्य रोडगे कसे बनवायचे
रोडगे अगदी सोपी घरगुती पद्धत
साहित्य:
४ वाटी गव्हाचे पीठ
१ वाटी बारीक रवा (सूजी)
२ टेबलस्पून ओवा
२ चमचे तेल किंवा तूप (मोहनासाठी)
चवीनुसार मीठ
आवश्यकतेनुसार पाणी
कृती
एका परातीत गव्हाचे पीठ, त्यात रवा आणि चवीनुसार मीठ आणि ओवा चुरून घाला. दोन टेबलस्पून तेल कडकडीत गरम करून मोहन ओता. थोडे थोडे पाणी घालून घट्ट गोळा करून घ्या. नंतर पहिल्यांदा थोडा मोठा गोळा घेऊन छोटी पोळी लाटा. त्यावर तुपाचा हात लावून कणिक लावा, मग त्यापेक्षा छोट्या दोन लाट्या लाटून त्यालासुद्धा तुपाचा हात लावून वरून पीठ पसरून घ्या. पहिल्यांदा मोठी पोळी त्यावर त्याच्या पेक्षा छोटी आणि त्यावर सर्वात लहान अशा तीन लाथीब्या एकावर एक ठेवून त्याचे रोडगे बनवा. हे अनेकप्रकारे शिजवू शकतात. आपण हे गोवारीवर शेकू शकता. आपण कढईत तेल चांगलं तापवून मध्यम आचेवर सोनेरी होईपर्यंत तळून शकता. किंवा ओव्हनमध्ये बेक करु शकता. तयार रोडगे वांग्याच्या भाजी सोबत सर्व्ह करा.