Malhari Martand Navratri special श्री खंडोबाला आवडणारा नैवेद्य; भरीत भाकरी पाककृती
भरीत भाकरी ही महाराष्ट्रियन पाककृती असून जेजुरीच्या खंडोबाचा आवडता नैवद्य आहे. खंडोबाचे नवरात्र सुरु आहे. तेव्हा हा नैवद्य नक्कीच खंडोबाला अर्पण करू शकतात. तसेच भरीत भाकरी ही पारंपरिक महारष्ट्री डिश आहे. वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी हा खंडोबाचा आवडता नैवेद्य आहे.
वांग्याचं भरीत
साहित्य-
मोठे वांगे- १
कांद्याची पात
हिरवी मिरची - ४
लसूण पाकळ्या
तेल - २ चमचे
मोहरी
जिर -१/२ चमचा
हळद- १/४ चमचा
मीठ चवीप्रमाणे
कोथिंबीर
कृती-
सर्वात आधी वांग्याला स्वच्छ धुवून घ्या. आता वांग्याला तेल लावून चाकूने खूप सारे भोके पाडा, आत लसूण पाकळ्या व हिरवी मिरची आत घालून गॅसवर दोन्ही बाजूनी भाजून घ्या.तसेच थंड झाल्यावर साल काढून वांगे पूर्ण मॅश करा. कढईत तेल तापवून मोहरी, जिरं, हिंग, लसूण मिरची पेस्ट, शेंगदाणे, हळद, कांद्याची पात घालून परतून घ्या. आता त्यात मॅश केलेला वांगे, मीठ घालून परतून घ्या. व शेवटी कोथिंबीर घालून साधारण एक मिनिट झाकून ठेवा.
बाजरीची भाकरी
साहित्य-
बाजरीचं पीठ - २ वाट्या
कोमट पाणी
मीठ चिमूटभर
तूप
कृती-
सर्वात आधी बाजरीचं पीठ एका परातीत घ्या, चिमूटभर मीठ घाला. हळूहळू कोमट पाणी घालत घट्ट सर पीठ मळून घ्या. पीठ मळून झालं की लगेच छोटे गोळे करा. दोन प्लास्टिक किंवा ओलं कापड घेऊन त्यात गोळा ठेवून हाताने दाबत-दाबत गोल भाकरी थापा. गरम तव्यावर दोन्ही बाजूनी मंद आचेवर भाजून घ्या. शेवटी गॅसवर थेट भाजल्यावर फुगते. गरमागरम भाकरीवर तूप लावा. आता भाकरी ताटात घ्या त्यावर भरीत घाला. व खंडोबाला नैवेद्यात नक्कीच ठेवा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik