मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: सोमवार, 11 नोव्हेंबर 2024 (15:05 IST)

मसालेदार भरली वांगी रेसिपी

साहित्य-
4 छोटी वांगी
1/5 चमचे भाजलेले शेंगदाणे
1 चमचा नारळाचा किस 
1 चमचा तीळ
1 चमचा आले-लसूण पेस्ट
1/2 कप टोमॅटो प्युरी
1 चमचा धणे पूड 
1/2 चमचा जिरे पूड 
1/2 चमचा गरम मसाला
1 चमचा हळद
1 चमचा कोथिंबीर 
चवीनुसार मीठ
 
कृती-
सर्वात आधी शेंगदाणे, तीळ, नारळाचा किस हे वेगवगेळे भाजून घ्यावे. आता हे भाजलेले साहित्य एकत्रित करावे व यामध्ये आलेलसूण पेस्ट घालावी. आता हे मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स करावे. आता वांगे स्वच्छ धुवून घ्यावे व त्यांना मधून चिरा देऊन घ्याव्या. आता एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये हे वांगे शॅलो फ्राय करून घ्यावे. व एका टिशू पेपरवर काढून घ्यावे. आता त्याच पॅनमध्ये तेल घालून त्यामध्ये टोमॅटोची प्युरी घालावी. तसेच परतवून घ्यावी. आता या मध्ये हळद, मीठ, जिरे पूड, धणे पूड आणि गरम मसाला घाला मिक्स करून घ्यावे. तसेच परतवून घ्यावे आता वरतून कोथिंबीर गार्निश करावी तर चला तयार आहे आपली भरलेली मसाले वांग्याची भाजी रेसिपी. पराठा किंवा पोळीसोबत नक्कीच सर्व्ह करू शकतात. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik