शुक्रवार, 13 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By

Amla Navami 2024 : आवळ्याच्या खास तीन रेसिपी

आवळा नवमी 2024: अक्षय नवमीच्या दिवशी आवळ्यापासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन करणे विशेष मानले जाते. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन भरपूर प्रमाणात असते. आवळ्यापासून अनेक प्रकारचे पदार्थ बनवले जातात. पण आज आपण आवळ्यापासून बनणाऱ्या काही सोप्प्या रेसिपी पाहणार आहोत. तर चला जाणून घ्या रेसिपी.  
 
आवळा मुरंबा-  
साहित्य- 
500 ग्रॅम आवळे 
10 ग्रॅम चुना
25 ग्रॅम साखर कँडी
600 ग्रॅम साखर
1 चमचा मिरे पूड 
5-7 केशर
1/4 चमचा वेलची पूड 
 
कृती-
आवळा मुरंबा बनवण्यासाठी सर्वात आधी ताजे आवळे घ्यावे व पाण्यामध्ये तीन दिवस भिजत घालावे. आता त्यांना पाण्यामधून बाहेर काढल्यानांतर त्यांना काटेरी चमच्याने टोचून घ्यावे. आता पाण्यामध्ये चुना घोळून त्यामध्ये हे आवळे परत तीन दिवस भिजत घालावे. आता नंतर हे आवळे पाण्यामधून काढून त्यांना खडीसाखरेचा पाण्याची वाफ द्यावी. आता हे आवळे एक कपड्यावर पसरवून वाळवून घ्यावे. आता साखरेचा पाक बनवून त्यामध्ये हे आवळे सोडावे आणि शिजवून घ्यावे. आता आवळे शिजल्यानंतर त्यामध्ये काळेमिरे पूड, केसर आणि वेलची पूड घालावी. त्यानंतर हा मुरंबा थंड करून काचेच्या बरणीमध्ये भरावा. तर चला तयार आहे आपली आवळ्यापासून मुरंबा रेसिपी. 
 
भरवा आवळा लोणचे-
साहित्य-
1 किलो आवळे 
100 ग्रॅम मोहरी 
100 ग्रॅम मोहरीची डाळ 
100 ग्रॅम तिखट 
अर्धा चमचा हळद 
25 ग्रॅम बडीशोप 
चिमूटभर हिंग 
500 ग्रॅम गोडे तेल 
 
कृती-
सर्वात आधी आवळे स्वच्छ धुवून घ्यावे. व पुसून घ्यावे. आता एका पातेलीमध्ये हे आवळे ठेवावे आता त्यामध्ये दोन चमचे तेल घालावे. व मंद आचेवर शिजवून घ्यावे. आता हे आवळे थंड करून घ्यावे.आता या आवळ्यामधील बिया वेगळ्या कराव्या. आता कढईत तेल गरम करून तेल थंड होऊ द्या. या तेलात वरील सर्व मसाले घालून परतवून घ्या. ते पूर्णपणे थंड झाल्यावर चमच्याच्या मदतीने आवळ्यामध्ये मसाले भरून बरणीत ठेवा व बरणी बंद करा. तर चला  चटपटीत भरलेले आवळा लोणचे तयार आहे.
 
मसालेदार आवळा लौंजी-
साहित्य-
250 ग्रॅम आवळा
2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
1 चमचा तिखट
1/4 चमचा हळद
चिमूटभर हिंग
2 चमचे धणे
1 चमचा बडीशेप
1चमचा मोहरी
चवीनुसार मीठ
तेल 
 
कृती-
सर्वात आधी आवळे स्वच्छ धुवून घ्यावे. आता प्रेशर कुकरमध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून २-३ शिट्ट्या घेऊन वाफवून घ्यावे. तसेच हे आवळे थंड झाल्यावर यामधून बिया वेगळ्या करून घ्यावा. आता हे आवळे चांगल्या प्रकारे मॅश करून घ्यावे. आता  कढईत तेल गरम करून त्यामध्ये मोहरी आणि जिरे घालावे. आता त्यात हिंग, बडीशेप आणि चिरलेली हिरवी मिरची घालावी. आता मॅश केलेले आवळे घालावे.व त्यातील पाणी आटू द्यावे. नंतर वरील मसाला साहित्य घालून चांगले मिक्स करावे व थोडा वेळ मंद आचेवर षिजवावे. आवळा लौंजी तेल सोडू लागल्यावर गॅस बंद करावा. तर चला तयार आहे आपली आवळा लौंजी रेसिपी. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik